पाडळी दर्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांची चमकदार कामगिरी

दत्ता ठुबे
पारनेर – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून आयोजित केरळ राज्यातील थुंबा येथील डॉ.विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) आयोजित शैक्षणिक सहल २०२४ व २५ साठीच्या निवड चाचणीत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत जिल्हा परिषदेच्या पाडळी दर्या प्राथमिक शाळेचे सहभागी झालेले ६ विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश प्राप्त केले.
जिल्हा परिषदेच्या पाडळी दर्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थींनी कु. मनिषा अनिल जाधव- इयत्ता ५ वी ,
कु समृद्धी रामदास गिरी- इयत्ता ६ वी
कु.स्वरा राजू जाधव- इयत्ता ६ वी
कु.समिक्षा अरुण येवले- इयत्ता ६ वी
कु. दिप्ती संदीप खोसे- इयत्ता ६ वी
कु.अनुष्का अनिल खोसे- इयत्ता ७ वी या सहभागी झालेल्या विद्यार्थिनींची केरळ राज्यातील थुंबा येथील शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली आहे.
या यशस्वी विद्यार्थीनींना पाडळी दर्या शाळेतील शिक्षक संजय गायकवाड, श्रीमती वैशाली वैद्य , रामदास बोरुडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच श्री रामदास खोसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री कैलास खोसे, केंद्रप्रमुख श्री दौलत येवले, विस्तार अधिकारी श्री रावजी केसकर , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील व ग्रामस्थांनी कौतूक केले आहे.
पाडळी दर्या सारख्या ग्रामीण व डोंगरी भागातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलींनी शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली स्व अध्ययन करून देश पातळी वरील परीक्षेत तालुका स्तरावरील गुणवत्ता यादीत यश मिळवून पाडळी दर्या गावाच्या च नव्हे , तर संपूर्ण ग्रामीण भागातील शाळांमध्ये मानाचा तुरा रोवला आहे.