स्पर्धेमूळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव- रामदास फुले

नेप्तीत गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण
नगर- नगर तालुक्यातील नेप्ती येथील वेताळबाबा मित्र मंडळ व द किंग ग्रुप यांच्या वतीने सावता महाराज मंदिराच्या पटांगणात गणेश उत्सवानिमित्त लिंबू चमचा, संगीत खुर्ची, पोत्यासह धावणे,रांगोळी स्पर्धाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले ,ग्रामपंचायत संतोष चौरे, नितीन कदम ,तन्मय पुंड ,भानुदास फुले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यामध्ये लिंबू चमचा प्रथम क्रमांक दिव्या कदम, द्वितीय क्र. तनिष्का लोंढे ,तृतीय क्र.यश कर्पे, संगीत खुर्ची प्रथम क्रमांक विराज राऊत, द्वितीय क्र. आदिती टाक ,तृतीय क्र. स्वराज कदम , पोत्यासह धावणे प्रथम क्रमांक यश कर्पे, द्वितीय क्र. साई फुले ,तृतीय क्र. स्वरा कर्पे , रांगोळी स्पर्धा प्रथम क्र. समीक्षा राऊत, द्वितीय क्र.उन्नती शिंदे, तृतीय क्र.साक्षी हसनाळे, साक्षी राऊत या यशस्वी विजेत्यांना रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच या स्पर्धेत काहीजणांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.

गणेशोत्सवात मंडळाने घेतलेल्या विविध स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळते .विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देताना विविध स्पर्धेत भाग घेऊन क्रीडा व इतर क्षेत्रांमध्ये देखील प्राविण्य मिळवले पाहिजे असे केल्यास सर्वगुण संपन्न पिडी उभी राहील तसेच कठोर परिश्रम घेऊन देशात गावाचा नावलौकिक वाढवावा . गणेश उत्सवात घेतलेल्या विविध स्पर्धामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे प्रतिपादन समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी केले आहे .
या स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे सूत्रसंचालन ओंकार भुजबळ यांनी केले.

यावेळी समता परिषदेचे शाखा अध्यक्ष शाहूराजे होले, सार्थक होले, तेजस नेमाने, सौरभ भुजबळ, नितीन शिंदे, राहुल भुजबळ , कुणाल शिंदे, संकेत भुजबळ ,ओंकार भुजबळ, आदित्य पुंड, संकेत कर्पे, वैभव बेल्हेकर शिवम सप्रे, अमित दरेकर, निखिल होले, विनायक बेल्हेकर ,मिलिंद होले ,बंटी मोरे प्रशांत रावळे ,शिवम रावळे हर्षल चौरे ,संभा राऊत ,सचिन दरेकर,अर्चना राऊत, बेबीताई भुजबळ, मंगल फुले, लताबाई होले , जयश्री भुजबळ, वैशाली शिंदे, पूजा टाक ,पुनम राऊत, विद्यार्थी, विद्यार्थिनी महिला व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते