इतर

आजचे पंचांग व राशीभविष्य दि २७/१२/२०२४

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०६ शके १९४६
दिनांक :- २७/१२/२०२४,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:००,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति २६:२७,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २९:२९,
योग :- धृति समाप्ति २२:३७,
करण :- कौलव समाप्ति १३:४०,
चंद्र राशि :- तुला,(१३:५७नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- धनु – मूळ,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- विशाखा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ११:०८ ते १२:३१ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:२३ ते ०९:४६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:४६ ते ११:०८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३१ ते ०१:५३ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०६ शके १९४६
दिनांक = २७/१२/२०२४
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
मनातील जुनी इच्छा पूर्ण कराल. महिला मनाजोगी खरेदी करतील. गुंतवणुकीचे पर्याय समोर येतील. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. सामाजिक स्तरावर मान मिळेल.

वृषभ
कामाच्या ठिकाणी अति घाई करू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक ठिकाणी नवीन योजना आमलात आणाल. सहकार्‍यांची मने जिंकून घ्याल.

मिथुन
आजचा दिवस मनाजोगा जाईल. आध्यात्मिक कामातून समाधान लाभेल. धार्मिक स्थळी मन रमेल. दानधर्म कराल. उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होईल.

कर्क
गूढ गोष्टी जाणून घ्याल. मानसिक चंचलता जाणवेल. भावनेला आवर घालावी लागेल. अति विचार करत बसू नका. अनपेक्षित लाभाची शक्यता.

सिंह
काही सकारात्मक बदल घडून येतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मनातील कडवटपणा दूर होईल. काही नवीन मार्ग सापडतील. जनसंपर्कात वाढ होईल.

कन्या
खोटी स्तुति करणार्‍यांपासून सावध राहावे. आपले निर्णय आपणच घ्यावेत. इतरांवर फार विसंबून राहू नका. बुद्धीला योग्य मार्गाला लावावे. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ
आनंदाची अनुभूति मिळेल. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अनुभवी व्यक्तींची मदत घेता येईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. वातावरण सकारात्मक राहील.

वृश्चिक
कुटुंबासमवेत फिरायला जाल. दिवस आनंदात घालवाल. घरासाठी काही नवीन खरेदी करता येईल. प्रवास मजेत पार पडेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.

धनू
जोडीदाराच्या मदतीने कामे पूर्ण कराल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिणाम पहायला मिळतील. भावंडांशी संबंध सुधारतील. शेजार्‍यांना मदत कराल.

मकर
बोलण्यात गोडवा राखून कामे करून घ्याल. आळस झटकावा लागेल. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. पारंपरिक कामातून लाभ संभवतो.

कुंभ
मानसिक अस्थिरता दूर होईल. मनाला येईल तसे वागाल. आज समाधानाला अधिक महत्त्व द्याल. ध्यान धारणेला प्राधान्य द्यावे. क्षुल्लक गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

मीन
अति विचारात वेळ वाया घालवू नका. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. परदेशी भाषा शिकण्याची आवड निर्माण होईल. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत . आध्यात्मिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button