पळसपुर परिसरातील शाळांना फ्रँकी फेबर इंडिया कंपनीच्या वतीने विविध साहित्याचे वितरण

दत्ता ठुबे
पारनेर – पुणे येथील फ्रँकी फेबर इंडिया कंपनी यांच्या सीएसआर फंडातून कंपनीचे फायनान्स डायरेक्टर संजय पवार यांच्या माध्यमातून पळसपुर आणि ढगेवाडीतील शाळांना पाच लाख रुपये किमतीच्या माहिती तंत्रज्ञान व शालेय साहित्य वितरणाचा सोहळा पळसपुर येथे संपन्न झाला.
या माहिती , तंत्रज्ञान व शालेय साहित्या मध्ये शाळांसाठी ६ संगणक, संगणक टेबल, ४ कपाट , २ इन्व्हर्टर, पाच ऑफिस टेबल व चेअर, टॅब , फॅन, पाण्याची टाकी व इतर साहित्य वितरित करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व कंपनीचे सीनियर एच आर डायरेक्टर पंकज जयस्वाल , फायनान्स डायरेक्टर संजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी केसकर , केंद्रप्रमुख बाचकर , पोखरीचे केंद्रप्रमुख आंधळे , भास्कर ढोले, अशोक आगळे सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी ओम मिश्रा , रश्मी मिश्रा , सरपंच रूपाली वाघमारे, सेवा संस्थेचेअरमन राजेंद्र आहेर सर , ग्रामविकास अधिकारी विशाल झावरे , रामदास ढोले,जना जी डोंगरे, सुरेखा डोंगरे, माजी चेअरमन बाळासाहेब डोंगरे, अक्षय डोंगरे, प्रतीक वाघमारे, श्रीकांत वाघमारे, बारकू शिंदे, बाबू आहेर, अहिल्याभाऊ डोंगरे, जिजाबा डोंगरे , विठ्ठल डोंगरे, विजय आहेर, काताळवेढा शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश आंधळे सर, बाबासाहेब कडुसकर, भाऊसाहेब आहेर, भाऊसाहेब डोंगरे, भास्कर पवार, बाबाजी पवार, गणेश आडसरे, स्वप्निल गराडे, साहील आहेर, हनुमंत आहेर, निता डोंगरे इत्यादी ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेर व सेवक वर्ग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेगेवाडी चे मुख्याध्यापक कोकाटे सर व सेवक वर्ग , आदर्श विद्यालय पळसपुरचे मुख्याध्यापक जाधव सर व सेवक वृंद , कारवाडी शाळेचे मुख्याध्यापक आगळे सर व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब आहेर सर तर आभार प्रदर्शन अशोक आहेर सर यांनी केले .
