इतर

शिव पाणंद रस्ते संदर्भात शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची २० सप्टेंबरला बैठक

शिवपाणंद रस्ते व शेत रस्तेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत तहसीलदारांशी होणार चर्चा

शहराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पाणंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे. दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या समस्या यासह शेतकरी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, शेतीपुरक व्यवसाय व इतर सर्व कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे,तसेच शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरता व यंत्रसामुग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही चांगल्या वाटेची आवश्यकता असते.

शिव, पाणंद शेत रस्त्यांचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकर्‍यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिव,शेत व पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्त्यांची मोजणी व शिव पाणंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करावी या बाबत सूचना देखील केल्या आहेत. परंतु तहसील कार्यालयांसह संबंधित विभागांकडून शेतकऱ्यांची होणारी अवहेलना थांबवण्यासाठी राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आला असुन अनेक शेतजमिनी शेत रस्त्या अभावी पडीक पडत चालल्या असुन अनेक फौजदारी स्वरूपांच्या घटनाही समोर येत असुन रस्त्याअभावी शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने शेतजमीनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असुन अर्ज बनवण्यापासून ते कोर्टाच्या अंतीम निकालापर्यंतचा शेतकऱ्यांचा पिढयान पिढया चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी शिव पाणंद शेतरस्ता कृती समिती शेवगाव यांच्यावतीने शेवगावात रस्ते पीडित शेतकऱ्यांची बैठक व शेवगाव तहसीलदार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे तशा आशयाचं पत्र शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळीचे महाराष्ट्र राज्याचे प्रणेते शरदराव पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव तहसीलदार यांना शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळ तथा कृती समिती शेवगाव तालुक्याच्या वतीने पत्र देण्यात आले.

यावेळी कृती समितीचे रामेश्वर उर्फ बंडू घुले, पत्रकार शहाराम आगळे, बाळासाहेब शिंदे, मधुकर पाटेकर,दादासाहेब बोडखे, सत्यनारायण जाधव, यांच्यासह उपस्थित पोपट हरदास,चंद्रभान गायकवाड, शिवाजी पोटफोडे, चंद्रभान घोरपडे, अर्जुन गायकवाड, भरत गोरे, रावसाहेब वावरे, ज्ञानेश्वर दौंड, दत्तात्रय रिंधे, परमेश्वर मिर्झे, संकेत बडे, श्रीकांत निकम, काकासाहेब हरदास,भाऊसाहेब वावरे, कानिफ सुसे,सुभाष बनकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तरी २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या महा बैठकीस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


शेवगाव येथे तालुक्यातील रस्ते पीडित शेतकऱ्यांची महा बैठक २० सप्टेंबर २०२४ रोजी होणार असल्याची घोषणा शिवपाणंद रस्ते व शेत रस्ते चळवळ महाराष्ट्र राज्याचे प्रणेते शरदराव पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी जाहीर केल्यानंतर शेवगाव कृती समितीने तालुक्यातील १०० ते १५० शेतकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत तशा आशयाचे पत्र तहसीलदार यांना दिले. व त्यांनीही त्या चर्चेस सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्याची चर्चा केली जाईल. असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button