पारनेर तहसिलची धडाकेबाज कारवाई वाडेगव्हान ते हिंगणी रस्ता खुला

दत्ता ठुबे
पारनेर -वाडेगव्हाण ते हिंगणी रस्ता (बेलवंडी फाट्यापर्यंत) अनेक वर्षापासून बंद होता. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. अनेक शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी शेतमाल वाहुन नेण्यासाठी रस्ता पुर्णपणे बंद होता. या रस्त्यालगत शेतकरी दिपक खंदारे यांची ५ एकर शेती अनेक वर्षापासून पुर्णपणे बंद होती.
शेतामध्ये डाळींब, पेरू, शेडनेट हाऊस व शेततलाव हि सर्व पिके रस्त्याअभावी सोडून द्यावी लागली त्यामुळे खंदारे यांची आर्थिक व मानसिक हानी झाली. अतिक्रमण धारकांना विनंती करूनही रस्ता खुला होत नव्हता अखेर दिपक प्रभाकर खंदारे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर यांनी दि.२६/०३/२०२१ रोजी दाखल केलेला मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ चे कलम ५(२) अन्वये रस्ता केस क्र.१८०/२०२२ पूर्वापार वहिवाट रस्ता प्रतिवादी यांनी अडविलेला सदर रस्ता खुला करून मिळनेकामी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पारनेर,ज्योती देवरे यांच्याकडे दावा दाखल केला परंतु ४ वर्षामध्ये अनेक तहसीलदारांच्या बदल्या झाल्या त्यामुळे रस्ता खुला करण्यात विलंब होत होता यामध्ये तहसीलदार ज्योती देवरे ,प्रभारी तहसीलदार गणेश आढारी , तहसीलदार शिवकुमार आवळकठे अखेर विद्यमान तहसीलदार गायत्री सौंदाने पारनेर यांनी रस्ता दावा क्र.१८०/२०२२ दि.२६/०७/२०२४ च्या आदेशानुसार रस्ता वहीवाटीसाठी खुला करून देणे बाबत आदेशित केले तरी सदर रस्ता करण्याची कार्यवाही दि.१९/०९/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता ते ६:०० वाजेपर्यंत वाडेगव्हाणचे मंडळाधिकारी एम बी. गायकवाड, पारनेरचे मंडळ अधिकारी काळे, जवळा मंडळ अधिकारी जयसिंग मापरी , वाडेगव्हाणचे कामगार तलाठी अशोक लांडे तसेच भूमिअभिलेखचे अधिकारी व पथक सुपा पोलीस स्टेशनचे अधिकारी लांडगे , मोहारे या सर्वाच्या संयुक्त कारवाईने रस्ता खुला करून दिला अखेर दिपक प्रभाकर खंदारे यांच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आले व अनेक शेतकऱ्यांना हा रस्ता वहिवाटीसाठी खुला झाला.

-अनेक वर्षापासून हा रस्ता अतिक्रमण विळख्यात होता व बंद होता. महसूल अधिकारी,भुमिअभिलेख अधिकारी तसेच पोलिस बंदोबस्तात संयुक्त कारवाईने रस्ता वाहुतुकिसाठी खुला करण्यात आला आहे अजूनही रस्त्यावर काही अतिक्रमणे आहेत ती काढण्यासाठी लवकरच लढा दिला जाईल.
(दीपक प्रभाकर खंदारे,
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शेतकरी)