इतर

भगवान शिवाच्या नामाचा महिमा अगाध आहे – समाधान महाराज शर्मा


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी


आधार नसेल तर तुमची साधना व्यर्थ ठरते. आयुष्य सार्थकी लावायचे असेल तर गुरुशिवाय तरुणोपाय नाही. भगवान शिवाच्या डोळयातील अश्रूंपासून तयार झालेल्या रुद्राक्षाचा महिमा अगाध आहे. त्यामध्ये एकमुखी ते १४ मुखी असे रुद्राक्ष असतात. त्याच्या नियमांचे पालन करुन धारण केल्यास मानसिक शांतता लाभते. संकटाच्या काळात भक्तांना आधार देण्यासाठी भोलेनाथ शिव नेहमी धावून येतो. त्यामुळे शिवाच्या नावाचा महिमा अगाध आहे. असे प्रतिपादन शिवकथाकार समाधान महाराज शर्मा यांनी केले.
स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमीत्त शेवगाव शहरातील खंडोबानगर मैदानावर येथे आयोजीत शिव महापुराण कथेमध्ये तिसरे पुष्प गुंफतांना शर्मा महाराज बोलत होते.

यावेळी शिवशंभू व स्व.मारुतराव घुले पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन माजी आमदार चंद्रशेखर घुले,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, येळेश्वर देवस्थानचे रामगिरी महाराज,पांडुरंग महाराज झंबड,उध्दव महाराज सबलस, दत्तात्रय महाराज कुलट,राम महाराज उदागे, शिवाजी महाराज काळे,ज्ञानेश्वर महाराज बटुळे आदींच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शर्मा महाराज म्हणाले की,वृध्द आई वडील ज्या घरात असतात आणि ते सुखी समाधानी असतात ते घर जगातील सर्वात श्रीमंत घर असते. त्यामुळे माणसे सांभाळायला शिका. जन्मदात्या आई वडीलांना अंतर देवू नका.नात्यामध्ये सुसंवाद ठेवा शक्ती आणि भक्तीची आराधना करणा-या शिवाच्या कृपेने आपल्याला काहीच कमी पडणार नाही.यावेळी शिव-पार्वतीच्या विवाह सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज हे माऊली म्हणून नेहमीच जगण्याचे बळ देतात. ज्यांचे माऊलींवर प्रेम आहे त्यांना जीवनात कशाचेच कमी पडत नाही. म्हणूनच कथाकार, कीर्तनकार यांचे आळंदी हे प्रेरणास्थान आहे.येथील शिव महापुराण कथेमध्ये समाधान महाराज शर्मा यांच्यासह महाआरती करतांना माजी आमदार चंद्रशेखर घुले,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती राजश्रीताई घुले, येळेश्वर देवस्थानचे रामगिरी महाराज व भक्तगण.शिक्षक संघटना, ज्येष्ठ नागरिक फिरस्ता ग्रुप व भोई समाज शेवगांव युवा पदाधिकारी व मान्यवर अतिथींच्या हस्ते महाआरती झाली.

प्रवेशव्दारावर शिवपार्वतीच्या पुतळ्यासमोर शिव पुराणातील विविध प्रसंगावर आधारीत रांगोळीचे आकर्षक रेखाटन शहरातील जागृती काथवटे व सोनाली हुशार या तरुणी करतात. कथा ऐकण्यासाठी तालुक्यातील भाविक भक्तांची उच्चाकी गर्दी वाढत आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी शिव महापुराण कथा नियोजन समितीचे सर्व पदाधिकारी योग्य नियोजन करीत आहेत. त्याबद्दल ह.भ प. शिवमहापुराण कथा वाचक श्री. समाधान महाराज शर्मा यांनी विशेष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button