अहमदनगर
आढळा परिसरातील गारपीटीची आमदार लहामटें नी केली पाहणी !

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आढळा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकर्यांचे खुप मोठ्या प्रमाणात शेती मालाचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीची पाहणी करत आज कार्यसम्राट आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोंभाळणे, केळी, टाहाकारी, समशेरपुर परिसरातील नुकसानीची बांधावर जात प्रत्यक्षात जाऊन पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले.

यावेळी मंडळ अधिकारी प्रिती वर्पे, मंडळ कृषी अधिकारी बिन्नर , परिसरातील सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
