इतर
नेप्तीचे माजी उपसरपंच सुभाष पुंड यांचे निधन .

अहमदनगर :नगर तालुक्यातील नेप्ती ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुभाष विश्वनाथ पुंड यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले.
चांगले बोलत चालत असताना अचानक आलेल्या हदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना जालिंदर पुंड व वैभव पुंड ही दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, सुना ,नातवंडे असा परिवार आहे .
ग्रामस्थांनी आपापले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली . त्यांच्या अंत्यविधी समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.