खरवंडी कासार येथे देवनाथ फाउंडेशनचा अभिस्तुत असा उपक्रम

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रति निधी:
खरवंडी कासार येथील देवनाथफाउंडेशन ,भगवानगड परिसराचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ऊस तोडणी कामगार महिलांना थेट उसाच्या फडात जाऊन प्रथमोपचार औषधाचे वाटप करण्यात आले. श्री जगदंबादेवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे चे विश्वस्त तथा देवनाथ फाउंडेशन प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त किर्तन वाडी येथील ऊसतोडणी कामगारांच्या महिला व त्यांच्या बालकांची तपासणी उसाच्या फडात जाऊन केली, व गरजू रुग्णांना योग्य ते औषधोपचार वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित महिला व बालकांना गुलाबपुष्प देत अल्पोपहार ही देण्यात आला. ऊस तोडणी कामगारांच्या आरोग्य प्रश्नावर सकारात्मक चळवळ उभारून विधायक कार्य निर्माण करण्याचे मनोगत याप्रसंगी डॉ. दराडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी महादेव जगताप ,कपिल बांगर, महादेव दौंड, अनिल जवरे, अमोल जवरे, गोकुळ दलाल, मनोज विश्वास, विष्णू जवरे, आदी मान्यवर उपस्थित होते.