इतर
नेवासा तालुक्यातील महेश पालवे यांचीअभियंता पदावर निवड

माका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील 2023 च्या सरळ सेवा भरती प्रक्रियेतून,अहमदनगर जिल्ह्यातील ने वासे तालुक्यातील माका येथील, महेश भानुदास पालवे यांची शासकीय धोरणानुसार सध्यातरी जिल्हा परिषद अहमदनगर सार्वजनीक बांधकाम उत्तर विभागीय कनिष्ठ अंभीयंता (स्थापत्य) पदी तसेच,जिल्हा जळगाव यावलच्या नगर परिषद या ठिकाणी अभियंतेपदी नुकती च निवड करण्यात आली असून, यासंदर्भात त्यांना महाराष्ट् राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नियुक्ती बाबतचे पत्रही देण्यात आले आहे. महेश पालवे हे ए.डी.सी. बँक शाखेत मा. शाखा अधिकारी कार्यरत भानुदास एकनाथ पालवे यांचे चिरंजीव असुन, या निवडीमुळे पाथर्डीनेवासा_शेवगावच्या पंचक्रोषीतील ग्रामस्थांकडुन त्यांचे
मोठ्या प्रमाणात स्वागत करुन अभिनंदन केले जात आहे.