
शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
शिर्डीतील श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने श्री साईबाबांनी त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना समाधी घेते वेळी अंतिम क्षणी विजयादशमीला (दसरा) दान दिलेल्या दिव्य ९ नाण्यांचा १०७ वा अभिषेक सोहळा सालाबादप्रमाणे आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. देश-विदेशातील अनेक साईभक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
कै.लक्ष्मीबाई शिंदे यांच्या नात श्रीमती शैलजाताई शिंदे-गायकवाड व पणतू श्री.अरुणराव शिंदे-गायकवाड पा. (ट्रस्टी) यांच्या शुभ हस्ते अभिषेक पूजा करण्यात आली.
सदर अभिषेक पूजेचे मंत्रोपच्चार शिर्डीचे ग्रामाचार्य गुरुजी यांनी केले.
ज्या साईभक्तांना आत्ता दर्शनाचा लाभ मिळाला नाही त्यांनी १४ जानेवारी २०२५ च्या शिर्डी साई-लक्ष्मी यज्ञ पूजेमध्ये सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा.
मो.९९६०२६५८१९ ९५११९०८९९९