इतर

ग्रीन एन क्लीन शिरडी फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…


चांगल्या कार्यासाठी ईश्वरी शक्ती पाठीशी सदैव उभी राहते…. गोरक्षनाथ गाडिलकर…

शिर्डी प्रतिनिधी :

संजय महाजन

स्वच्छता अभियान,वृक्षारोपण, संवर्धन, शिरडी परिक्रमा, पर्यावरणपूरक गणपती,विषमुक्त भाजीपाला, परिक्रमा प्रेरणास्थळांची विषयावर सातत्याने दहा वर्ष काम करणे तप पुरतीकडे वाटचाल आहे. या कमी निश्चितपणे आपल्या पाठीशी ईश्वरी शक्ती आहे. चांगले सामाजिक काम करताना आपल्याला त्रास होतो. परंतु टीकाकारांची परवा न करता आपण सातत्य ठेवलं पाहिजे. चांगले कार्य करत रहा. समाज नक्कीच पाठीशी उभा राहतो. ग्रीन अँड क्लीन शिर्डी या सामाजिक संस्थेचा दशक वृत्ते सोहळा शिर्डी बस स्थानक येथे स्वच्छता अभियान राबवून पार पडला. याप्रसंगी श्री साई बाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यावेळी वरील प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात केले.


गेले दहा वर्षापासून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन प्रमाणे विविध सामाजिक समाज उपयोगी उपक्रम अविरतपणे करत आहे. शिर्डी शहर व परिसरात 11000 वृक्ष लावून त्यांचे संवर्धन देखील केले आहे. त्याचप्रमाणे शिर्डी परिक्रमा हा एक धार्मिक उत्सव गेल्या पाच वर्षापासून अतिशय धार्मिक व उत्साह पूर्ण वातावरणात साजरा होत आहे. याप्रसंगी संस्थेचे प्रमुख अजित पारख यांनी आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. गेली दहा वर्षातील प्रवासादरम्यान संस्थेला मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले. व्हीजन हाऊस कीपिंग व शिर्डी नगरपरिषद आदी संस्थांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी बस स्थानक बनकर साहेब सचिन सोमवंशी, सचिन तांबे, जितेंद्र शेळके संजय शिरडीकर मा. उपनगराध्यक्ष अनिल शेजवळ डॉ. धनंजय जगताप, दिलीप जगताप, किशोर बोरावके, भारत चांदोरे, प्रा. रघुनाथ गोंदकर, प्रा. डॉ. विशाल तिडके,तुकाराम गोंदकर, प्रदीप बाफना, डॉ. दीपक जानी, गवारे साहेब, राजनीताई गोंदकर, ईश्वर तरकसे , किशोर तरकसे, नारायण जारडे, दर्शन वैद्य व लिओ ची टीम तसेच दीपक उत्तराधी यांची स्वच्छता कर्मचारी…. आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिलाल पटेल व ताराचंद कोते यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button