इतर
सकल ओबीसी/ एन टी समाज बांधवांची अकोल्यात उद्या बैठक

अकोले – प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील सर्व सकल ओबीसी/ एन टी समाज बांधवांची बैठक सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता शेकइवाडी ता अकोले येथे आयोजित केली आहे
. अकोले तालुक्यातील ओबीसीसमाज संघटनेची कार्यकारिणी घोषित करून पदाच्या अधिकार व जबाबदार्या प्रदान करणे तसेच ओबीसी समाज प्रश्न व ओबीसी समाजाची आगामी काळातील भूमिका निश्चित करून तालुका एकसंघ बनविणे आणि या व ईतर काही महत्वाचे विषयावर चर्चा होणार आहे
तालुक्यातील सर्व ओबीसी एन टी समाज बांधवांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यांत आले आहे
अकोले तालुका सकल् ओबीसी सर्व समाज जातीनिहाय प्रमुख कार्यकर्ते यांनी आपले भागातील किमान आठ दहा समाज बांधवांना मिटींग साठी घेऊन यावे असे आवाहन केले आहे
— —-