श्री क्रांती शुगरचा ३ ऱ्या गळीत हंगामा चा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ संपन्न .

पारनेर – देवीभोयरे येथील श्री क्रांती शुगर कारखान्याचा ३ ऱ्या गळीत हंगामाचा जनरेशन बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा पौरोहितांच्या मंत्रांच्या जयघोषात , होम विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
श्री क्रांती शुगर कारखान्याची ३७५० गाळप क्षमता असून श्री क्रांती शुगर व्हाईस चेअरमन निलेश नवले सपत्नीक यांच्या हस्ते व जालींदर नवले , कैलास नवले , संत तुकाराम कारखान्याचे संचालक दिलीप दगडे , अनिल लोखंडे , पांडुरंग नवले , मुरलीधर नवले , सुमित नवले , कार्यकारी संचालक नरेंद्र दुर्वे , प्रशासकीय अधिकारी आनंदा माने , शिवाजीराव औटी ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील , चीफ इंजिनीयर रमेश पुंडे , प्रॉडक्शन मॅनेजर कुलकर्णी , कैलास बराशीले , सुरक्षा अधिकारी सुपेकर , कारखान्याचे अधिकारी , कर्मचारी , ऊस तोडणी मुकादम व इतर मान्यवरांच्या उपस्थित आणि पौरोहित्यांच्या मंत्रांच्या जय घोषात होम व २०२४ – २५ या ३ ऱ्या गळीत हंगामाचा अग्नि प्रदिपन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक नरेंद्र दुर्वे म्हणाले की , गेल्या वर्षी १ ल्या वर्षीचा गळीत हंगामात १ लाख ८o हजार क्विंटल साखर उत्पादन झाले , या वर्षी ५ लाख मॅट्रीक टन ऊसाचे गाळप करणार असून कारखान्याचे कामगार व ऊस तोडणी कामगार यांच्या साथीने कारखान्याला चांगले वैभव प्राप्त करून देवू , कारखाना चालविणे तसे सोपे नाही व अवघड ही नाही . सर्वांनी एकदिलाने व झटून काम करून हे आवाहन आपण सर्वजण सहज पेलू यात , अशी अपेक्षा ही कार्यकारी संचालक नरेंद्र दुर्वे यांनी व्यक्त केली .