वर्धमान जैन पतसंस्थेच्यावतीने चेअरमन रिखबशेठ जैन व संचालक हे सभासदांना भेटवस्तू वाटप करताना

शिर्डी प्रतिनिधी /संजय महाजन
पिंपळनेर येथील श्री वर्धमान जैन बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने एका आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या सभासदांना भेट वस्तू म्हणून
एरिष्टोक्रेट एअरप्रो लगेज प्रवासी बॅगचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, कुंदनलाल गोगड, धनराज जैन, विष्णू जिरेपाटील, श्याम कोठावदे, योगेश नेरकर, डॉ जितेश चौरे, नथमलजी गोगड, गोविंदराव गांगुर्डे, सुरेश सोनार हे जेष्ठ संचालक उपस्थित होते.
श्री वर्धमान सहकारी पतसंस्थेच्यावतीने दरवर्षी सभासदांना भेट वस्तू व लाभांश दिला जातो. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी ही दीपावलीचे औचित्य साधून संस्थेचे सर्व संचालकांनी अॅरिस्टो कंपनीची विमान प्रवासी बॅग शेकडो सभासदांना देण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने भेट वस्तू वितरण सोहळा संस्थेच्या कार्यालयासमोर च्या प्रांगणात धनराज जैन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन रिखब जैन,उपाध्यक्ष नितीन बुरड,संचालक कन्हैयालाल टाटीया, दिलीप गवळे, हिरामण चौरे,प्रदीप संघवी, चोरडिया यांच्या सह सर्व संचालक व व्यवस्थापक किशोर कुलकर्णी यांनी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन व यशस्वितेसाठी व्यवस्थापक किशोर कुलकर्णी, व त्यांचा सहकारी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिनेश गोगड यांनी केले.