आश्रमशाळा सामोडे येथे क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

शिर्डी प्रतिनिधी
: (संजय महाजन)
पिंपळनेर – येथील अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा यांची जयंती जन जाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य मनेष माळी होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.एस.एस.सुर्यवंशी यांनी बिरसा मुंडा यांच्या बद्दल माहिती दिली. उमेश माळी अध्यक्षिय भाषणातून आदिवासी क्रांतिकारक योध्यांचा इतिहास व जन जाती गौरव दिनाबद्दल माहिती दिली.

विद्यार्थ्याच्या कलागुणांना या कार्यक्रमातून प्रोत्साहन देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विजय ढोले यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.प्रविण पगारे यांनी केले.जनजाती गौरव दिनाच्या या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक झेड.एम.गवळी, संदिप पवार,प्रा.विजय ठाकरे,प्रा.राजेंद्र सोनवणे, तुषार नेरकर, बन्शीलाल बहिरम, रितेश एखंडे,शरद मोहिते, यांच्यासह सांस्कृतिक विभाग प्रमुख गणेश भावसार व चतुर्थ कर्मचारी प्रयत्नशील होते