बालविवाह मुक्त भारत अभियान” या अभियानाला संगमनेरात पाठिंबा.

संगमनेर प्रतिनिधी
भारत सरकारच्या “बालविवाह मुक्त भारत अभियान” या अभियानाला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्थेचा पाठिंबा. दिल्ली येथे विज्ञान भवन मध्ये केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाने “बालविवाह मुक्त भारत” अभियानाचा शुभारंभ केला. सरकारच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने सर्वांना शपथ दिली गेली.
संगमनेर मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संस्थेने बाल विवाह मुक्त भारत अभियानाला पाठिंबा दिला.संस्थेच्या वतीने मातोश्री लॉन्स, या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये विविध शाळेतील किशोवयीन मुलींना व तालुक्यातील महिलांना एकत्रित करून रॅली काढण्यात आली होती ,तसेच त्यांना शपथ देण्यात आली व पथनाट्ट्याच्या माध्यमातून बाल विवाह मुक्ती बाबत प्रबोधन केले गेले. या कार्यक्रमासाठी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, पंचायत समितीचे टंचाई विभागाचे श्री.आरगडे, केंद्रप्रमुख श्री.राहणे , नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर चंद्रशेखर दिवेकर, सायखिंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी. सातपुते, सौ.मंगल शिंदे, सौ.अनिता उगले, श्री.विकास पुंड, संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रदीप दारोळे, मंगल कदम, मंगल काळे, यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी म्हणाले की मुलींनी स्वतःच्या पायावर आधी उभे राहावे, मगच लग्नाचा विचार करावा. तसेच आपल्या पालकांना देखील याविषयी जागरूक करावे. तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री.अनिल नागणे म्हणाले की,”बालविवाह मुक्त भारत अभियान” या उपक्रमास माझा पाठिंबा आहे, या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश पाळंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रदीप दारोळे,मंगल कदम, योगेश तारडे, संभाजी कसबे ,किरण जानेकर, गोरक्ष घोडे, पांडुरंग धराडे, अमोल मगर, सुप्रिया नाईकवाडी, हर्षा बागुल, कोमल जगताप, वैशाली भालेराव, व संस्थेचे इतर कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल काळे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.