दि .16 ते 18 डिसेंबर रोजी मवेशी (ता.अकोले) येथे प्रकल्प स्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे आयोजन!

अकोले प्रतिनिधी
– एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजुर अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या 21 शासकीय व 17 अनुदानित आश्रम शाळेतील केंद्रस्तरीय स्पर्धेतून निवड झालेल्या 1040 आश्रम शाळा विद्यार्थ्यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प स्तरीय क्रीडासमितीच्या अध्यक्ष तथा राजुर प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी श्रीम.देवकन्या बोकडे यांनी दिली.
शैक्षणिक संकुल मवेशी ता. अकोले येथे दि.16 ते 18 डिसेंबर अखेर संपन्न होणाऱ्या क्रीडास्पर्धेत कबड्डी,खोखो,हाॅलीबाॅल,हॅन्डबाॅल,तसेच वैयक्तीक क्रीडाप्रकारात लांबउडी, उंचउडी, धावणे,गोळाफेक,भालाफेक, थाळीफेक या क्रीडाप्रकारात वय वर्ष 14,17 व 19 वर्ष वयोगटात सदर स्पर्धा होणार असुन सदर प्रकल्प स्तरीय क्रीडास्पर्धा यशस्वीतेसाठी क्रीडासमिती, स्वागतसमिती, आरोग्यसमितीसह एकुण 15 विविध प्रकाराच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
या क्रीडास्पर्धेबरोबरच आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे व गुणवत्तापूर्ण शिक्षण विकासासाठी आश्रमशाळा शिक्षकांसाठी प्रकल्प स्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक या गटात सदर शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा प्रदर्शन आयोजित केले असुन यशस्वी शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.
दि.16 डिसेंबर रोजी उदघाटन तर दि. 18 डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या बक्षिस वितरण समारंभासाठी विविध मान्यवर उपस्थित रहाणार असुन सदर क्रीडाउत्सवासाठी अकोले तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन सहा.प्रकल्प अधिकारी श्री. मनोजकुमार पैठणकर (प्रशासन),तुषार पवार,(योजना) दिपक कालेकर (शिक्षण) यांनी केले असुन स्पर्धा यक्षस्वीतेसाठी
लेखाधिकारी संजय सोनवणे,कार्यालयीन अधिक्षक सुनिल मोरे,शिक्षण विस्तार अधिकारी आंबादास बागुल, आदि.विकास निरीक्षक अनिल जोशी व शाम कांबळे याच्यासह विविध आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा मार्गदर्शक प्रयत्नशील आहेत.