इतर

राज्य सरकारने केंद्राच्या अनेक योजना अडविल्याने विकासाला खीळ- आमदार आशिष शेलार


पारनेर मध्ये भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न



दत्ता ठुबे
पारनेर – प्रतिनिधी
केंद्र सरकारने अनेक योजना राज्यांना दिल्या आहेत त्या योजनांना राज्य सरकारने आडकाठी केल्याने बंद आहेत.महाविकास आघाडी सरकार डबल इंजिनचे सरकार असल्याने विकासाला स्पीड ब्रेकर राज्य सरकारचा असल्याची टीका भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांना जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे यासाठी मुलंभुत संघटना बांधणी गरजेची आहे.भाजपामध्यै मनाविरूध्द काही तर पचवायला शिका त्यामुळे सावरकर भक्त भुमिका घेतली पाहिजे तरच पारनेर तालुक्यात कमळ फुलवायला पाहिजे असे सांगून सबुरीचा सल्ला देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत विरोधी पक्षात असणारा लोकांशी संवाद साधला आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे भाजपाचे मुंबई उपाध्यक्ष सूर्यकांत पवार प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्‍वनाथ कोरडे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ अश्विनी थोरात भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे सरचिटणीस डॉक्टर अजित लंके तालुकाध्यक्ष उषा जाधव जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे माजी तालुकाध्यक्ष कृष्णाजी बडवे पोपटराव मोरे पोपटराव लोंढे संभाजी आमले अरुण रोहकले सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरसाळे उपाध्यक्ष नवनाथ सालके विश्वनाथ रोहकले सरचिटणीस सुरेश मेसै कुशाहारी भांड सचिन ठुबे तुषार पवार सुनील मस्के शेखर सोमवंशी बाबाजी बोरुडे काशिनाथ नवले बाबासाहेब बाळासाहेब चव्हाण अशोक शेळके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले की
हिंदू राष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हणाल किंवा म्हणायला लावला तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जेलमध्ये टाकतील असेही आमदार आशिष शेलार म्हणाले.त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे‌ ए‌क सेवेकरी असुन त्यांच्या माध्यमातून आदर्श हिंदुस्थानची निर्मिती होणार आहे.राम मंदिर होईल ३७० कलम होईल परंतु गरीबांना मदत करू परंतु हे करत असताना आगामी काळात निश्चित ताकद देईल असे आश्वासन आमदार आशीष शेलार यांनी केले आहे. मनात भाव आहे‌ तो‌ स्वाभाविक आहे
जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळी लंका दहानासह सज्ज आहे रामराज्यासाठी लंका दहन आवश्यक आहे “आठ साल बेमिसाल” हा मोदी सरकारचा कारभार आपण जनते समोर मांडणार आहे . महिलांना सन्मान देण्याचे काम केले आहे या योजनेचा लाभ” उज्वला योजना ” एक क्रांतिकारी योजना ठरली आहे.प्रत्येक कुटुंबाला गॅस जल जन धन योजना राबविण्यात आली आहे .जनाऔषधी केंद्र सरकारने सुरू केली आहे . आयुष्य मान भारतच्या माध्यमातून गरीबांना समर्पित असलेले सरकार आहे‌.आठ वर्षाच्या कार्यकाळात पंधरा दिवसांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे शेतकऱ्यांना ६ हजार दर वर्षी देत आहेत.
फडणवीस सरकारच्या काळात कांद्यासाठी २ रूपये प्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान दिले आहे परंतु आज भेटायला व‌ बोलायला कोणी तयार नाही.परंतु शेतकऱ्यांना केंद्र बिंदू ठेवून काम केले आहे कोरोना काळात ८० लाख जनतेला अन्नधान्य वितरण व पुरविण्याचे काम केले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे म्हणाले की
कार्यकत्यांनी चिंता बरोबर आहे राजकारणात वाद व स्पर्धा असतात त्यामुळे काम करत असताना अडचणी सामना करावा लागतो.कार्यकर्तया अडचणी पक्षा पर्यंत पोहोचविण्याचे काम होत असते. राष्ट्रवादी बरोबर नगर पंचायतीच्या निवडणुकीत आघाडी केली परंतु त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वबळावर आपण उतरणार असल्याचे सांगितले आहे .महाविकास आघाडी सरकार लबाडीचे सरकार आहे शेतकरी अडचणीत आहे वीज नाही विकास नाही ओबीसी आरक्षण यांच्या आपल्या मधील हवेदावे पुढे आणु नका भविष्यात हे‌ हेवेदावे विसरून आपण हातात हात घालून काम करणार आहे.त्यामुळे‌ आगामी काळात आमदार हा भाजपचा असणार असल्याचा जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे म्हणाले की राज्य पातळीवरील नेत्यांनी आम्हाला वेळ दिला आहे कुणीतरी आमच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो.प्रदेश भाजपाला पारनेर भाजपा विकसीत करायचा का नाही ? असा सवाल केला आहे. सुप्याची पाणी योजना ही भाजपा सरकारच्या काळात झाली आहे परंतु या योजनेचे उद्घाटन करायचा घाट दुसरेच कोणी तरी करत आहेत.त्यामुळे दिवंगत खासदार दिलीप गांधी माजी मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री चंद्र शेखर बावनकुळे यांनी पारनेर तालुक्यांतील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे.सुपा औद्योगिक वसाहतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मोठे उद्योग आले आहे.त्यामुळे‌ प्रदेश पातळीवरूंन‌ आम्हाला ताकद द्यावी अशी मागणी विश्वनाथ कोरडे यांनी आली आहे.पारनेरचा पाणी प्रश्न महत्त्वाचा असुन यासाठी केंद्र पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आम्हाला पारनेर तालुक्यात काही जण फुलुन देणार नाही त्यामुळे प्रदेश पातळीवरूंन‌ ताकद गरजेचे आहे.
खासदार निधीतला एकही छदाम भाजपाच्या
कार्यकर्त्यांना मिळाला नाही तसेच मध्यंतरी ज्या केंद्र सरकारच्या रूग्णवाहिका व इतर साहित्य वाटण्यात आले ते संघटनात्मक कार्यात व पक्षाच्या बांधणीसाठी व वाढीसाठी काही काम करत नाही .

छाया-शरद झावरे पारनेर

पारनेर मध्ये भाजपा कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी तालुकाध्यक्ष वसंत चेडे
यावेळी तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे म्हणाले की ध्येय धोरणानुसार पक्ष बांधणीचे काम करावे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगले काम करावे लागणार आहे.भाजपाभधील अंतर्गत धुसफूस सुरू असुन याला दुजोरा दिला आहे.गरज असल्यानंतर आम्ही पक्षाचे आहोत असे सांगतात मात्र भाजपा कार्यकर्त्यांना दाबण्याचे प्रकार होत आहे.सुपा औद्योगिक वसाहतीत भाजपा कार्यकर्त्यांना बळ द्यावे असे आवाहन तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी सांगितले आहे.

आमदार आशिष शेलारांच्या समोर भाजपाची पदाधिकारांची खदखद ..
नगर दक्षिण चे खासदार सुजय विखे‌ पाटील यांचा एक रुपयाचा निधी भाजप कार्यकर्त्यांच्या गावात खर्च झाला असून केंद्र सरकारच्या योजना आहे की ते आपल्या कार्यकर्त्यांच्या गावात राबवत असतात. तसेच विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आम्हाला विश्वासात न घेता परस्पर कार्यक्रम आयोजित करतात. यासंबंधी प्रदेश पातळीवर तक्रार करू नये त्याची दखल घेतली जात नसल्याने प्रदेश पातळीवरून आम्हाला ताकद द्यावी अशी मागणी भाजपची प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे व तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांनी केली आहे तर इतर अनेक गोष्टींबाबत तक्रारीचा पाढा वाचत आपल्या मनातील खदखद पदाधिकारांनी आमदार आशिष शेलार यांच्याकडे व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button