दूध उत्पादकांना अमिष दाखविणारे कोरोना संकटात कुठे होते -आ थोरात

संगमनेर दूध संघाची वार्षिक सभा संपन्न
संगमनेर प्रतिनिधी
सध्या संपूर्ण तालुक्यात खाजगी दूध संकलन केंद्रावाले दूध उत्पादकांना एक किंवा दोन रुपये वाढवून देण्याचे अमिष दाखवत आहे मात्र हे आमिष काही दिवसच राहते त्यामुळे दूध उत्पादकांनी खाजगीवाल्यांच्याआमिषाला बळी न पडता कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्वच बंद होते त्या काळात संगमनेच्या राज हंस संघाने तुमचे दूध घरी राहून दिले नाही त्या कोरोनाच्या संकटाच्या काळात खाजगी दूध संकलन केंद्रावाले कुठे गेले होते असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला
दूध उत्पादकांनी खाजगी दूध संकलन केंद्रांना दूध न घालता संगमनेर सहकारी दूध संघ हा आपला आहे असे मानून तो टिकला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आ बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील उत्पादकांना केले आहे
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ.थोरात बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे चेअरमन प्रतापराव थोरात ओहोळ डॉ जयश्रीताई थोरात ,शंकर खेमनर, गणपत सांगळे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे ,नवनाथ आरगडे, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, लक्ष्मणराव कुटे,दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, जिल्हा बँकेचे कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे ,पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ सुनील तुंबारे आदी उपस्थित होते
आमदार थोरात म्हणाले की मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये शेतकर्यांना मदत करण्यासाठी संगमनेर तालुका दूध संघ सर्वात पुढे होता मात्र त्या संकटाच्या काळात खाजगी दूध संकलन केंद्रावाले कुठेच दिसत नव्हते अन या दोन वर्षाच्या काळात खाजगीवाल्यांनी दूध उत्पादकांना कुठलीही मदत न करता वाऱ्यावर सोडले मात्र या संकटाच्या काळातही तालुक्यातील शेतकऱ्यांचे दूध घरी न राहू देता तोच संघाने खरेदी केले आणि महाराष्ट्र राज्य दूध महासंघाच्या महानंद यांनी खरेदी करून त्याची पावडर तयार केली हे दूध उत्पादकांनी विसरू नये आणि खाजगी दूध संकलनवाल्यां च्या आमिषाला बळी बळी न पडता संगमनेर तालुका सहकारी दूध संघ हा आपला दूधसंघ आहे असे मानून तालुक्यातील दूध उत्पादकांनी खाजगी दूध संकलन केंद्र वाल्यांकडे दूध न टाकता दूध कोरोना संकटाच्या काळात मदत करण्याची भूमिका ठेवणा-या संगमनेरतालुका सहकारी संघाच्या पाठीशी भक्कम उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले
आमदार डॉ तांबे म्हणाले की, सध्या देशात भांडवलदारांचे रक्षण करणारे सरकार आहे .सर्वसामान्यांच्या विकासासाठी सहकाराची व्यवस्था असून प्रत्येक कार्यकर्त्याने सहकारा वर निष्ठा ठेवली पाहिजे. असे आवाहन करून आपले पशुधन टिकविण्यासाठी. प्रत्येकाने गाय गोठ्याची स्वच्छता राखावी आणि दूध उत्पादकांनी गाईंचा विमा उतरावा असे आवाहन आ डॉ. तांबे यांनी केले आहे
अध्यक्षीय भाषणात बोलताना दूध संघाचे चेअरमन रणजीत देशमुख म्हणाले की,कोरोना संकटामध्ये सर्वच उद्योग व व्यवसायांना फार मोठा फटका बसला याला यास संगमनेर दूध संघ ही अपवाद नाही. त्या काळात दूध संघाने तयार केलेली पावडर स्टॉक होती. या आर्थिक वर्षात त्याची विक्री केली. मात्र उत्पादन खर्च आणि विक्री दरातील तफावतीमुळे त्याचा बोजा या वर्षात पडणार आहे .तसेच कोरोना मुळे विक्रीलाही फटका बसला असून डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असल्याने पर्यायी. दूध विक्री कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले
प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे यांनी केले नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ सुजित खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व सुरेश जोंधळे यांनी केले तर व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांनी आभार मानले यावेळी सर्वाधिक दूध उत्पादन करणा ऱ्या दूध संस्थांचा आमदार थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला
- .
संगमनेर तालुक्यामध्ये लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव दोन गावामध्ये वाढला होता मात्र तो आता आटोक्यात आणण्याचा प्रयत्नकरण्यात आलेला आहे संगमनेर तालुका सहकारी दूध (राजहंस दूध) संघाच्या वतीने लंम्पी या आजारा बाबत तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या असून तालुक्यात गायींचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे .तर आगामी काळात पशुधन वाचवण्यासाठी तालु क्यातील सर्व पशुधनासाठी मोफत लसीचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजीत देशमुख यांनी सांगितले आहे.