इतर

घोटी तालुक्यातील कचरवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप .

,

नाशिक;

     रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने घोटी तालुक्यातील दुर्गम वस्ती असलेल्या कचरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्टेशनरी, पुस्तके, चित्रकला साहित्य, क्रीडा साहित्यची भेट दिली.

          14 ऑक्‍टोबर 23 रोजी रोटेरियन्सची टीम, घोटी तहसीलमधील दुर्गम वस्ती असलेल्या कचरवाडी येथे उतरली.  त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, वही, पेन, पेन्सिल, क्रेयॉन बॉक्स इत्यादी वस्तूंचे  वाटप केले आणि बसण्यासाठी चटई देखील दिली.  याशिवाय फुटबॉल, व्हॉलीबॉल, जंप दोरी, बॅडमिंटन रॅकेट आदी खेळाचे साहित्य पण शाळेला देण्यात आले.

     विद्यार्थ्यांना शाळेचा आनंददायी अनुभव मिळेल, परिणामी या विद्यार्थ्यांची केवळ उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास देखील होईल.

     क्लबचे अध्यक्ष, रोटे मंगेश आपशंकर यांनी या चामुचे नेतृत्व केले ज्यात क्लबच्या दोन्ही सचिवांसह अनेक सदस्य होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button