आंभोळ येथील भिकाजी सावळेराम चौधरी यांचे निधन

अकोले- अकोले तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या अकोले येथील प्रवरा पतसंस्थेचे सलग 20 वर्षे व्यवस्थापक पदाची धुरा सांभाळणारे भिकाजी सावळेराम चौधरी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले.
आंभोळ (ता अकोले) येथील रहिवासी असणारे भिकाजी चौधरीं यांचे अकोले तालुक्यातील सहकार क्षेत्रांत ६० वर्ष योगदान लाभले तालुक्यात त्यांनी विविध सोसायट्या मध्ये सेक्रेटरी म्हणून उत्कृष्ट काम केले त्यांनतर त्यांनी अकोले येथील प्रवरा पतसंस्थेमध्ये १९९७ ते २०१७ असे, सलग २० वर्षे व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ठ काम केले.
शिक्षणाचे महत्व जाणून त्यांनीं मुलांना उच्च शिक्षित केले कुटुंबातील सर्वजण उच्च शिक्षित असून मूलगा श्री बबनराव चौधरी पुण्यात भारत फोर्ज या नामवंत कंपनी वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मुलगा श्री बाळासाहेब चौधरी मुंबई येथे त्यांचा स्वतःचा व्यवसाय उत्कृष्टपणे सांभाळत आहेत. त्यांचे नातू शुभम, संकेत, मयुर हे तिघे आयटी क्षेत्रात नामवंत कंपन्यामध्ये काम करत आहेत. व संदेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.
त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिस्तबद्ध व काटेकोरपणा प्रामाणिकपणा आणि, सचोटीने जीवन व्यतीत केले त्यांच्या .सहकार क्षेत्रातील एक उत्कृष्ठ मार्गदर्शक व्यक्तीमत्व हरपले आहे