डॉ. सोमनाथ मुटकुळे यांचे पुस्तकांचे दिल्लीत प्रकाशन

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर येथील नाट्य लेखक व कलावंत डॉ.सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिलेल्या दहा नाटकांच्या एकूण तीन पुस्तकांचे प्रकाशन दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये करण्यात येणार आहे.
डॉ . सोमनाथ मुटकुळे नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून आजवर मोठ्या प्रमाणावर लेखन करून समाजप्रबोधन केले आहे.त्यांच्या खेळ मांडीयला या नाटकाला राज्य शासनाच्या वतीने भा.रा तांबे हा पन्नास हजार रुपयेचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर यापूर्वी त्यांच्या लेखन संहिता,नाट्य कलाकार म्हणूनही त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवले आहे.त्यांनी लिहिलेले राजश्री आणि इतर नाटके, निवडुंग आणि इतर नाटके, चक्र आणि इतर नाटके अशी तीन पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. या तीन पुस्तकांमध्ये एकूण दहा नाटकांचा समावेश करण्यात आला आहे. नाट्य लेखनाच्या माध्यमातून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यासारखे राष्ट्रपुरुष विचार जिवंत केले आहेत. त्यांचे विचार समाज मनात रुजवण्यासाठी नाटकाचे माध्यमातून त्यांनी केलेले लेखन अनेक मान्यवरांनी गौरवलेले आहेत.
दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात येणार आहे. हे पुस्तक पुणे येथील चपराक प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे . संमेलनातील संत महिपती महाराज प्रकाशन कट्ट्यावरती या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रकाशक घनश्याम पाटील यांनी दिली.