सर्वोदय विदयालयाचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांत मानाचा तुरा.

अकोले/प्रतिनिधी-
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अकोले तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा मारूतीराव कोते अभिनव पब्लिक स्कुल व वसुंधरा अकॅमेडी अकोले येथे संपन्न झाल्या.
या कबड्डी स्पर्धांत तालुक्यातील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजुर येथील संघाने नेत्रदिपक कामगिरी करत तालुकास्तराव यश संपादन केले. १९ वर्षे वयोगटातील संघाची जिल्हास्तरावर निवड झाली. तर १७ वर्षे वयोगटातील संघ उपविजेता ठरला.१९ वर्षे वयोगटात कर्णधार तेजस लोटे,हेमंत चौधरी,नयन घिगे,विशाल म्हशाळ,अनिकेत देशमुख,अनिकेत बांडे, राहुल डगळे,अमित म्हस्के,शुभम देशमुख, दिपक पोटकुले,रितेश माचरेकर,विर मेहता आदी खेळाडूंनी सहा फेऱ्या पुर्ण करत अंतिम फेरीत अगस्ती कॉलेज अकोले संघाला धरपकड करत चितपट करून सोडले.तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून या संघाची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.तर १७ वर्षे वयोगटातील कर्णधार वैभव कोंडार,प्रतिक ईधाटे,सिद्धेश आरोटे,करण देशमुख,प्रविण दाभाडे, अनिकेत वाळेकर,आकाश डेरे, श्रीराज तळपे,ओमकार डगळे,अनिकेत भांगरे,राहुल मोहिते,सार्थक आरोटे आदी खेळाडूंनी तालुक्यातील अनेक दिग्गज संघांना पराभूत करत तालुकास्तरावर उपविजेते ठरले.
सदर खेळाडूंना क्रिडा शिक्षक प्राचार्य भाऊसाहेब बनकर जालिंदर आरोटे,विनोद तारू, सचिन लगड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.पंच म्हणून अनिल चासकर, रामदास कासार,शिवाजी चौधरी,शांताराम साबळे,सुरेश वाकचौरे,कुमार पालवे,दत्तात्रय घुले आदींनी शिस्तबद्ध काम पाहीले.या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,मारूती मुठे,अशोक मिस्त्री, विजय पवार,प्रकाश टाकळकर, प्रकाश महाले,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी,पालक यांसह प्राचार्य सुनिल धुमाळ, शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे,भाऊसाहेब हासे,क्रिडा समितिचे अध्यक्ष योगेश उगले आदींनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——