अबीतखिंड (भोजनेवाडी) येथे कै.बुधाबाई भोजने यांचा स्मृतिदिन व स्व. मधुकरराव पिचड सामुदायीक अभिवादन सभा!

अकोले- अकोले तालुक्यातील अबीतखिंड (भोजनेवाडी)येथील आदर्शमाता कै बुधाबाई नामदेव भोजने यांचे तृतीय पुण्यस्मरण व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सामुदायीक अभिवादन सभा अबीतखिंड (भोजनेवाडी)येथे शनिवार दि 18/01/2025 राजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली आहे
या निमित्ताने राष्ट्रीय प्रवचनकार ह भ प शोभाताई तांबे यांचा प्रवचन कार्यक्रम तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग व सह्याद्री सेवा संघ मुंबई यांच्या वतीने संविधान, साहित्य, संस्कृती ,समजसेवकांचा ,सावित्रीच्या लेकींचा ,सन्मान सोहळा पार पडणार आहे
या सन्मान सोहळ्यात श्रीमती हेमलता ताई मधुकरराव पिचड, शोभाताई तांबे,सौ मंजुषा काळे ,विघ्नेश्वरी आहेर श्री गोविंद साबळे, अजय चौधरी ,,सुनील गिते, नंदू राऊत रामचंद्र भोजने यांचा विविध क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते रामनाथ भोजने यांनी सांगितले

यावेळी कोतुळ ,अबीतखिंड, , पळसूंदे , आंभोळ, फोपसंडी,सातेवाडी परिसराचे वतीने लोकनेते माजीमंत्री जलनायक स्व. मधुकरराव पिचड यांचे स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सामुदायीक अभिवादन सभा आयोजित केली आहे

या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रामनाथ भोजने, संगीता भोजने, अभिषेक भोजने , ऐश्वर्या आढारी, मुकीदा भोजणे , धोंडिबा भोजने , श्रीमती विठाबाई भोजने, पूजा भोजने, तसेच अबीतखिंड , व भोजनेवाडी ग्रामस्थांनी केले आहे