राजुर बसस्थानकाला क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात यावे – विजय पवार

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजुर बसस्थानकाला क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आरपीआयचे अकोले तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे या तालुक्यात जुलमी, अन्याय, अत्याचारा विरुद्ध अनेक चळवळी झाल्या तालुक्यातील क्रांतिकारकांचा हा इतिहास आणी त्यांच्या प्रेरणा पुढच्या पिढी पर्यंत नेणे आवश्यक आहे
अकोले तालुक्यातील विकास पुरूष स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या पाठपुराव्याने अकोले तालुक्यातील ब्रिटिशकालीन भंडारदरा धरणाला क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय नामकरण करण्यात आले आहे त्याच धरतीवर राजूर ही एक मोठी बाजार पेठ आहे ४० गाव डांग भागाचे दळणवळण व आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे आदिवासी भागातील राजूर गाव हे तालुका दर्जाचे गाव आहे या ठिकाणी तालुक्यातील अनेक आदिवासी आश्रम शाळा , महाविद्यालये आहेत शिवाय आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहे या भागातील आदिवासीं क्रांतिकारकांचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी राजूर येथे असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळा च्या बसस्थानकाचा विकास करून क्रांतिकारक राघोजी भांगरे असे नाव देण्यात यावे
याबाबत ग्रामपंचायत राजुर यांनी तसा ठराव करून ही मागणी राज्याचे परिवहन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे करण्याची करावी. आमदार डॉ .किरण लहामटे यांनी यासाठीं लक्ष घालून शासन स्तरावर प्रयत्न करावा असे श्री पवार यांनी म्हटले आहे
याबाबत आपण स्वतः आर पी आय चे नेते विजयराव वाकचौरे यांचे सोबत परिवहन मंत्री व आदिवासी विकास मंत्री यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक तालुका अध्यक्ष श्री विजय पवार यांनी सांगितले