अकोले येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

पालकमंत्री ना.विखे पा. यांचे हस्ते होणार उदघाटन
अकोले प्रतिनिधी
– महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन अकोले येथील महालक्ष्मी मंगल कार्यालय, कारखाना रोड येथे सोमवार दि.29 मे रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आलेले आहे.या शिबिराचे उदघाटन राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते होणार असल्याची माहिती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,राजूरचे प्राचार्य संजय कुटे यांनी दिली.
या करियर मार्गदर्शन शिबिरामध्ये १० वी/ १२ वी नंतर करियर च्या संधी,व्यक्तिमत्व विकास,रोजगार व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन होणार आहे.तसेच विविध संस्था मार्फत मार्गदर्शन पर प्रदर्शनाचे स्टॉल लावण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिवराव लोखंडे,विधान परिषद सदस्य आ.किशोर दराडे,आ.प्रा. राम शिंदे,आ.सत्यजित तांबे,विधानसभा सदस्य आ.डॉ.किरण लहामटे,माजी आ.वैभवराव पिचड,अकोले नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ.सोनालीताई नाईकवाडी,राजूर ग्रामपंचायत च्या सरपंच सौ.पुष्पाताई निगळे, अहमदनगर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.डी. शिंदे,तहसीलदार सतीश थिटे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,राजूर चे प्रकल्प अधिकारी राजन पाटील,जिल्हा कौशल्य,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी हे मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या करियर मार्गदर्शन शिबिरासाठी 10वी, 12 वीच्या विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी व इतर युवक- युवतींनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य स संजय कुटे,प्राचार्य जि. टी.गवळी व प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी केले.