जादूगार हांडे फाउंडेशन चा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा

अकोले प्रतिनिधी
अकोलेशहरातील छत्रपती शिवाजीनगर, येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनी अकोले नगरपंचायत चे अध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्या हस्ते झेंडावंदन संपन्न झाले .प्रास्ताविकात संस्था अध्यक्ष जादूगार हांडे यांनी संस्थेचे विविध सामाजिक उपक्रम व सामाजिक जबाबदारी विषयी नमूद केले. संस्थेच्या वतीने अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा उंच खडक बुद्रुक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोरपडवाडी यांना उपक्रमशील प्राथमिक शाळा 2024 -25 पुरस्काराने शाल ,पुष्पगुच्छ ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
नवरदेव चित्रपट निर्मितीसाठी निर्माता,दिग्दर्शक निरंजन देशमुख यांचा शानदार सन्मान करण्यात आला.
मनोगतामध्ये प्रा.शांताराम गजे सर, निर्माता निरंजन देशमुख रमेश खरबस सर ,रवी रुपवते सर.पत्रकार सागर शिंदे, प्रा विजय भगत सर,राजयोग न्युजचे संदीप दातखिळे यांनी संस्थेच्या सर्वांगीण ,सामाजिक, शैक्षणिक, समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले व संस्था गुणवंतांचा दखल घेण्याचे महत्वाचे कार्य करते.

भविष्यातील उपक्रमासाठी सदिच्छा दिल्या .यावेळी जेष्ठ नागरिक यादवराव नाईकवाडी ,प्रा.गजें सर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी झालेल्या कवी संमेलनात यादवराव नाईकवाडी, ए .बी. देशमुख सर, अर्चना राहुरकर, जेष्ठ कवयत्री मंदाकिनी हांडे इ.कविंनी कविता सादर करून उपस्थितीतांची वाहवा मिळवली. प्रमुख उपस्थितीत जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, उपनगराध्यक्ष शरद नवले, सुनील मंडलिक, पत्रकार प्रशांत देशमुख , मुख्याध्यापक गिरे सर, मुख्याध्यापक भुजबळ सर, मेजर संतु भोर, सी न्युजचे भारत रेघाटे,रमेश वाघ सर,शोभा शिंदे , के.टी. मंडलीक सर, मीनाक्षी व मारूती शेंगाळ सर,सुरेखा ढगे, होमगार्डच्या साळवे मॅडम, माया नाईकवाडी, बोंथले मॅडम, खंडू मंडलिक, माधव आरोटे, गोरक्ष शिंदे ,मारुती गभाले, बी.टी. जोरवर, दिलीप डोखे इत्यादी मान्यवरां सोबत नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .या शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमती पुष्पा नायकवडी यांनी केले तर आभार प्रदर्शन अगस्ती फार्मरचे चेअरमन विकास आरोटे यांनी केले .अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.