गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध – नितीनभाऊ काकडे

बोधेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ….!
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
माजी मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, खासदार सुजयदादा विखे पाटील, तसेच शेवगाव-पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या माध्यमातून बोधेगावात तसेच बोधेगाव जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकासकामे झाली आहेत. तसेच यापुढे देखील भविष्यात नियोजित केलेले विविध विकास कामे, गावातील गावअंतर्गत सर्व रस्ते, सर्वत्र बंदीस्त गटारी, गाव अंतर्गत पथदिवे, जिल्हा परीषद शाळा शुशोभीकरण, व्यायाम शाळा यासह गावात जी जी विकास कामे राहिली ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करून गावाचा कायापालट करणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजना ह्या गावात आणून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन बोधेगावचे उपसरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनभाऊ काकडे यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगामार्फत सन २०२०/२१ सालच्या अंतर्गत वार्ड क्रमांक सहा मध्ये ५ लाख ३९ हजार ६१६ रुपये खर्चाच्या लाडजळगाव रस्ता ते वडते घर या अंतरावर बंदिस्त गटारीच्या कामाचा शुभारंभ तसेच ७ लाख ६६ हजार ६६७ रुपये खर्चाच्या बोधेगाव येथील बडे मामा घर ते म्हस्के, इस्माईल शेख यांच्या घरापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच सुभाष पवळे तसेच बोधेगावचे उपसरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनभाऊ काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात नितीनभाऊ काकडे हे बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य नितीनभाऊ काकडे, बोधेगावचे सरपंच सुभाष पवळे, सदा आप्पा कानडे, सामाजिक कार्यकर्ते संजय पोटभरे, सुरेश कोहोक, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गर्जे, रमजुभाई पठाण, ग्रामपंचायत सदस्य सुभाष अकोलकर, सुनील चव्हाण, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक बाळासाहेब काशीद, मनोज जैन, कोकाटे मेजर, विकास परदेशी, जोशी देवा, दिलावर भाई, जगन्नाथ गुंजाळ, प्रकाश पोटभरे, गरुड सर, गंगाधर ढवळे, राजू राळेगणकर, बाबासाहेब शिरसाठ, रवींद्र कळसने, देवढे मामा, धायकर मिस्तरी, बाबासाहेब अकोलकर, संजय शिंदे, चाचर गुरुजी, योगेश गर्जे, तसेच कर्मचारी बंडू चव्हाण, राजू डोंगरे, ठेकेदार भैय्या गरड यांच्यासह परिसरातील आदी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.