पुंन्याची शिदोरी घेऊनच मृत्यूला सामोरे जावे -ह भ प बद्रीनाथ महाराज नवल

नेवासा – मृत्यू ही एकमेव घटना आहे की जी ची वेळ आणि काळ ठरलेला असतो पुंण्याची शिदोरी घेऊन मृत्यूला सामोरे जावे असे ह भ प बद्रीनाथ महाराज नवल (पैठणकर )यांनी सांगितले
मनुष्य जीवनात जीवनातील सर्व घटनांची वेळ ही अनिश्चित आहे मात्र मृत्यू या एकमेव घटनेचा काळ आणि वेळ हा निश्चित असतो त्याला कोणीही अडवू शकत नाही असे सांगत बद्रीनाथ महाराज नवल यांनी केलफक्त मृत्यु याचं घटनेचा काळ,वेळ हा निश्चित स्व रुपाचा आहे म्हणुन,मनुष्यरुपी जन्मात मनुष्याने प्रामुख्याने मृत्यची तयारी केली पाहिजे.
याबाबत ह.भ.प.बद्रीनाथ महाराज नवल (पैठणकर) यांनी समाज प्रबोधन करतानां, आपल्या मधुरवाणीतुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मृत्युची तयारी करतानां,आपल्या दैनंदिन जिवनातल्या कर्माच्या संपुर्ण वासनांना मनुष्याने आवर घालून, पुण्याची शिदोरी सोबत घेऊन मृत्युला सामोरे गेल्यासं,पुन्हा 84 लाख योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो.म्हणुन मृत्यच्या दुखाःतुन चुकण्या करीता मृत्युची तयारी करूनच मनुष्य मृत्यु पावला पाहिजे असा उपदेश नवल यांनी केला
माका येथील पत्रकार दत्तात्रय विक्रम शिंदे यांच्या मातोश्री वै.सौ.यशोदाबाई विक्रम शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांना केला. यावेळी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थितीत होते