इतर

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंडचा ग्रँड अवॉर्ड समारंभ 2025 मुंबईत संपन्न….

मुंबई दि 24

वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स, इंग्लंडचा ग्रँड अवॉर्ड समारंभ 2025 मुंबईत मोठया भव्यतेने संपन्न झाला मुंबईत 24 ऑगस्ट 2025 रोजी फेअरफील्ड बाय मॅरियट येथे झालेल्या या सोहळ्यात यूके, यूएसए, नेपाळ व भारतातील 15 राज्यांमधील प्रतिनिधी उपस्थित होते. 25 प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे मा.डॉ. दिवाकर सुकुल साहेब (मानसशास्त्रज्ञ) लंडन.व मा. प्रा.डॉ.मधु कृष्णन (अध्यक्ष) तथा (AUPG) अमेरीका, मा.राजेंद्र दर्डा साहेब ( मा. शालेय शिक्षण मंत्री) महाराष्ट्र शासन मुंबई मा.लोकेश चंदन साहेब(IAS),मा.डॉ.सुरदास प्रभू,डॉ.सोहिनी सास्त्री मॅडम श्री. संजय कोहली, मा.अनिल जेठवाणी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉ.व्ही.व्ही.पोपेरे आदिवासी सेवक (महाराष्ट्र शासन) तथा जनरल सेक्रेटरी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर यांना (EEA-25) या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाकरिता हिंदी मालिकेतील कलाकार देखील उपस्थित होते. श्रीम.रूपल पटेल, श्री.तनुज महाराशब्दे, श्री.पंकज बेरी, श्री.बिनाईफर कोहली, श्रीम.चारुल मलिक, श्री.मोहित ललवानी,श्री. विशाल कपूर,श्रीम.कांचन पगारे, श्रीम.कमल घिमिरे, मास्टर आन तिवारी व श्री.आशीष पाटील श्री. मारुती बांगर सर अकोले इ.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण World Record of Excellence च्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच भारतातील 25 व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.


कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.संजय पंजवानी श्री. परवेज मंत्री यांनी केले. समारोपात ॲम्बेसिडर डॉ.नेलीमा मॅडम यांनी उत्कृष्टतेचा गौरव व जागतिक ऐक्य यावर भर दिला. कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button