पिंपरी जलसेन मध्ये झालेल्या पाणलोट विकास कामाचे खा.आनंदराव आडसूळ यांनी केले कौतुक

दत्ता ठुबे
पारनेर – पिंपरी जलसेनमध्ये पाणलोट क्षेत्राचे झालेले काम पाहून जिल्हा बँकेच्या संचालिका गितांजली शेळके यांचे कौतूक करावे , तेवढे कमीच आहे,असे गौरवोद्गार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व खा.आनंदराव आडसूळ यांनी काढले
यावेळी खा.आडसूळ पुढे म्हणाले की,पिंपरी जलसेनमध्ये पाणलोट क्षेत्राच्या कामाची संकल्पना मांडली व ती गितांजली यांनी उचलून धरली,त्यामुळे पिंपरी जलसेनला राज्य शासनाचा राज्यस्तरीय मानाचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असे ही खा.आडसूळ म्हणाले.
खा.निलेश लंके यांनी गुलाबराव शेळके व संपूर्ण शेळके परिवाराचे कौतूक करून महानगर बँकेच्या वतीने पारनेरकरांना मुंबईत आर्थिक ताकद देऊन आधार देण्याचे मोठे काम केल्याने आज खऱ्या अर्थाने पारनेरकर मुंबईत ताठ मानेने उभे आहेत.जलसेन नावातच पाणी असून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात.भर उन्हात उभे राहून त्यांनी पाणलोट क्षेत्राचे काम पूर्ण केले.त्याचबरोबर त्यांनी आजू बाजूच्या गावांनाही जोडण्याचे काम केले.यांची जी विकासात्मक कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करून देण्याचाही शब्द खा.लंके यांनी दिला तर राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शेळके परिवाराचे योगदानाबद्दल गौरव केला.
प्रास्ताविक करताना जिल्हा सहकारी बँक व महानगर बँकेच्या संचालिका गितांजली शेळके यांनी पिंपरी जलसेनमध्ये पाणलोट क्षेत्राचे उर्वरित काम करताना येणाऱ्या अडचणी व उर्वरित कामांचा ऊहापोह केला तर या कामामुळे येथील ग्रामस्थ उपजीविकेसाठी बाहेरगावी जात असे ते थांबले व गावातील आपापल्या शेतातच राबवू लागल्याने शेतातील उत्पन्न वाढू लागले.गाव सुजलाम सुफलाम झाले.काम करताना मदतीचे अनेक हात पुढे आल्याने हे काम करता आले.अजून गावाची वीजेची समस्या कमी करण्यासाठी सोलरच्या माध्यमातून वीजेची समस्या सोडविण्याचा विचार बोलून दाखवला व गावाला नजीकच्या काळात पाण्याची समस्या राहणार नाही , मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे , फक्त त्यासाठी पाणी मीटर द्वारे देण्याचा विचार ही गितांजली शेळके यांनी बोलून दाखवला .
यावेळी माजी आमदार डॉ . सुधीर तांबे , अशोक पवार , अशोक धात्रक , नगरसेवक रविंद्र इथापे , माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण , महानगर बँकेच्या संचालिका स्मिता शेळके यांनी मनोगत व्यक्त केले .
” उदय गुलाबराव शेळके फाऊन्डेशन जलसेन पुरस्कार २०२५ “, पारनेर तालुक्यातील विविध गावांमधून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उच्च पदाला गवसणी घातलेले पळसपूरचे अभिजीत आहेर यांची केंद्रीय गुप्तचर अधिकारी , वडझिरेचे नवनाथ ढवळे पोलीस उपायुक्त , बाभूळवाडेचे मिलिंद जगदाळे उपजिल्हाधिकारी , वडझिरेचे गणेश दिघे उपजिल्हाधिकारी , लोणी मावळ्याचे वैभव पडवळ जिल्हा पोलीस उपधीक्षक , शिरापूरचे दीपक शेलार पोलीस उपाधीक्षक , सागर कदम पोलीस उपाधीक्षक , निघोजचे गौरव वांडेकर उपायुक्त , बाभूळवाडेचे राहुल जगदाळे सहाय्यक आयुक्त आरटीओ,दरोडीच्या प्रियंका पावडे दुय्यम निरीक्षक सातारा,पिंपरी जलसेनच्या प्रेरणा काळे,सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर थोरात , सहायक पोलीस निरीक्षक दर्शन थोरात , अंकुश रणदिवे सहाय्यक पोलीस निरीक्षक , निघोज च्या प्रियंका शेटे / कवाद सहायक पोलीस निरीक्षक,अमोल पडवळ व वैभव पडवळ , सुनिल सालके महसूल आयुक्त सुनील पवळे ,अविनाश मावळे तलाठी,पारनेर तालुक्यातील महिला पत्रकार सौ निलम खोसे पाटील यांचा सन्मान चिन्ह,छत्रपती संभाजी महाराजांचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला तर पारनेर तालुक्यात पाणलोट क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे पानोली , काळकूप , भाळवणी , कासारे व नांदूर पठार या गावांना प्रतिष्ठेचा पुरस्काराचे मानपत्र , सन्मान चिन्ह व रोख ११ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू,सामाजिक कार्यकर्ते माधवराव देशमुख,महानगर बँकेच्या चेअरमन सुमनताई शेळके,व्हाईस चेअरमन भास्करराव कवाद,माजी व्हाईस चेअरमन सिताराम आडसूळ,प्रभाकर कवाद,लक्ष्मण गाजरे,सर्व संचालक,कर्मचारी,जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड,मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किसनराव पावडे सर,ज्ञानदेव लंके,उद्योजक मच्छिंद्र लंके,भानुदास खोसे,वसंतराव कवाद,प्राचार्य सहदेव आहेर,भाऊसाहेब आहेर,सुभाष बेलोटे,ठकाराम लंके,शिवाजीराव जाधव,शिवाजीराव औटी,विनोद फापाळे,सुभाष साठे,वसंतराव वांढेकर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पिंपरी जलसेनचे माजी सरपंच लहू थोरात यांनी आभार मानले.
यावेळी गितांजली शेळके यांच्या माध्यमातून पिंपरी जलसेन गावात झालेले पाणी आडवा , पाणी जिरवा योजनेतंर्गत बंधारे , चर , खड्डे या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत साठवून मुरल्याने विहीरींची पाणी पातळी वाढली.ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे अनुभव चित्रफिती द्वारे दाखविण्यात आले .