उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महिला व बाल कल्याण मंत्री ना. लोढा यांचा अंगणवाडी सेविकांकडून सत्कार

मुंबई दि28 राज्यातील अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र शासनाने नुकतीच मानधनात वाढ लागू केली त्यामुळे भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवार दिनांक 26 जून 2023 रोजी मंत्रालयात मुंबई राज्याचे महिला व बाल कल्याण मंत्री मा.ना.मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार मानले. आंगणवाडी सेविका चे मानधनात वाढ गेली 5 वर्ष पासून प्रलंबित होती, भारतीय मजदूर संघाच्या पाठपुरावा मुळे आंदोलने मुळे महाराष्ट्र शासनाने योग्य वेळी निर्णय घेवून सेविकांना दिलासा मिळाला आहे .
तसेच महाराष्ट्रातील विज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न, समस्या बाबतीत सविस्तर निवेदन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) मा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांना दिले. या वेळी मा ऊर्जा मंत्री यांनी प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करून कामगारांना न्याय दिला जाईल असे आस्वासन मा उर्जा मंत्री यांनी दिले आहे. यावेळी अंगणवाडी संघटनेचे प्रदेश अध्यक्षा सुरेखा गायकवाड, तासगाव तालुका अध्यक्षा शाकीरा इब्राहिम सय्यद, लतिका पाटील पदाधिकारी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे (संलग्न भारतीय मजदूर संघ)प्रदेश अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे, संघटन मंत्री उमेश आनेराव उपस्थित होते .
दिनांक 26 जून रोजी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या शिष्ट मंडळाच्या वतीने राज्याच्या प्रधान सचिव ऊर्जा मा.श्रीमती आभा शुक्ला यांची भेट घेतली. तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांना भेडसावत असलेल्या समस्यां त्यांना सांगितल्या. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा सोबत 15 दिवसात मिटिंग घेतली घेवून सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, महामंत्री सचिन मेंगाळे व संघटनमंत्री उमेश आनेराव उपस्थित होते.