नेप्तीत सावता महाराज पुण्यतिथी साजरी

अहमदनगर -नगर तालुक्यातील नेप्ती येथील संतश्रेष्ठ शिरोमणी सावता महाराज मंदिरात सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,माळी समाज व ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावता महाराज पुण्यतिथी निमित्त समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर परिसर स्वच्छ करून सडा टाकून आकर्षक रांगोळ्या काढल्या. तसेच मंदिरात सावता महाराज मूर्ती भवती आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली होती. संत सावता महाराजांच्या मूर्तीला प्रा. भाऊसाहेब पुंड यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. तसेच आकाश महाराज फुले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कांदा ,मुळा, भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली .भाविकांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी आकाश महाराज फुले यांचे प्रवचन झाले ते म्हणाले की, संत सावता महाराज दिवसभर कष्ट करीत होते .त्याचबरोबर ते ईश्वर भक्ती सुद्धा करीत होते. त्यांनी जनसामान्याला आत्म उन्नतीचा मार्ग दाखविला.

आपल्या मळ्यातील भाज्यांमध्ये त्यांनी विठ्ठलाचे रूप दिसत होते. ते शेतात शेतामध्ये कांदा, मुळा याचे पीक घेत होते. त्यामध्ये त्यांना देव दिसत होता देवाला पाहण्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची गरज नसून विठ्ठल आपल्या कामातच सावता महाराजांनी पाहिला असे प्रतिपादन शिवव्याख्याते युवा कीर्तनकार आकाश महाराज फुले यांनी केले. रात्री नेप्ती भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला .ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड यांच्याकडून मंदिरासाठी एल.ई.डी. Lebलाईट भेट देण्यात आल्या .तसेच सागर शिंदे व नितीन शिंदे यांच्या वतीने मंदिरातील फर्निचरचे काम करण्यात आले.यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, शाखा अध्यक्ष शाहूराजे होले, प्रा.एकनाथ होले, भानुदास फुले, नानासाहेब बेल्हेकर, तेजस नेमाने, सार्थक होले, कुणाल शिंदे, विनायक बेल्हेकर ,अमित दरेकर, रमेश रावळे, वैभव बेल्हेकर ,मिलिंद होले, निखिल होले, सिद्धांत शिंदे, कुणाल शिंदे, हर्षल चौरे, किसन कांडेकर,दिनेश फुले ,तुकाराम चौरे , तुषार भुजबळ, सौरभ भुजबळ, सिताराम पुंड, कैलास चौरे, राहुल भुजबळ, ओंकार भुजबळ, तुकाराम होले, रोहिदास भुजबळ, सुमन भुजबळ, लताबाई होले, विमल शिंदे ,शकुंतला फुले, रोहिणी पुंड ,जमुना पुंड, मंगल फुले व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . मा. संपादक साहेब ,वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती आहे .