सुजित झावरे पाटील यांची वासुंदे, वडगाव सावताळ परिसरासाठी नविन सबस्टेशन बाबत मागणी

दत्ता ठुबे
पारनेर :-पारनेर तालुक्यातील परिवहन महामंडळअंतर्गत ६५ बसेस कार्यरत होत्या पंरतु कालांतराने गाडयाचे प्रमाण कमी करण्यात आलेले आहे. सदस्थितीत ४५ बसेस कार्यरत असून त्यातील ९ ते१० बसेस येता ३१ मार्च अखेर स्क्रॅपमध्ये जाणार आहेत. सदयस्थितीत पारनेर डेपो मध्ये २५ बसेस कमी असल्याने तसेच नियमित गाडयांच्या वेळेमध्ये बदल केल्याने शालेय,महाविदयालयीन विदयार्थ्यांची तसेच ग्रामीण भागातील व आदिवासी भागातील नागरिकांची मोठया प्रमाणावर गैरसोय होत आहे. तरी याबाबत विभाग नियंत्रक, रा.प.म.मं. अ.नगर यांना याबाबत उचित निर्देश देऊन लवकरच याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
तसेच पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ, वासुंदे या दोन्ही गावांचा भौगोलिकदृष्टया विस्तार मोठा असल्याने दोन्ही गावांना विजेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. दोन्ही गावे मध्यवर्ती ठिकाणी आहेत.जर याठिकाणी विज उप केंद्र ( सबस्टेशन ) दिल्यास सदर दोन्ही गावांसह परिसरातील अनेक गावांचा विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तरी याबाबत आपल्या स्तरावरून ऊर्जा विभागाकडून सदर वडगाव सावताळ, वासुंदे येथे सबस्टेशन मंजुर करणेबाबत राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांना सुजित झावरे पाटील यांनी विनंती केली आहे.