राजापूर च्या हुतात्मा स्मारकास 75 वर्ष पूर्ण !ग्रामस्थांच्या वतीने स्मृतिदिनाचे आयोजन

संगमनेर प्रतिनिधी
सन 1950 साली तालुक्यातील राजापूरला झालेला गोळीबार संपूर्ण राज्यात गाजला होता. तत्कालीन सरकारच्या धान्य लेव्ही धोरणाविरुद्ध महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले होते.
या आंदोलनात असंख्य शेतकरी, महिला सहभागी झाले होते. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरूद्ध सुरू असलेले हे दखलपात्र आंदोलन चिरडण्यासाठी 9 मार्च 1950 साली कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यामध्ये तीन कार्यकर्ते शहीद झाले.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. क्रांतीकारकांच्या या हुतात्मयाची स्मृती जपण्यासाठी राजापूरकरांनी गावात हुतात्मा स्मारकाची उभारणी केली. प्रतिवर्षी 9 मार्चला या हुतात्म्यांना अभिवादन करूण्यात येत असून या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते
.
या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी आठ वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तर रविवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी हुतात्मा व्हॉलीबॉल क्लबच्या वतीने हॉलीबॉल स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 9 मार्च 2025 रोजी गोळीबाराच्या या घटनेस 75 वर्षे पूर्ण होत असल्याने राजापूर ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असणार असून याप्रसंगी राष्ट्रीय किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, अॅड. कॉ. सुभाषराव लांडे, अॅड. कॉ. बन्सी सातपुते, स्मिताताई पानसरे यांच्यासह संगमनेर, अकोले तालुक्यातील कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. याप्रसंगी राजापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.