इतर

आ. सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून संगमनेर शहरात १० ई- टॉयलेटचे लोकार्पण




महिला दिनी सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव

संगमनेर (प्रतिनिधी)–लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात निळवंडे धरण थेट पाईप लाईनसह अद्यावत इमारती आणि सातत्याने विकासाच्या योजना यामुळे हे शहर वैभवशाली ठरले  आहे.  आमदार सत्यजित तांबे यांच्या एक कोटी रुपयांच्या निधीतून संगमनेर शहरात दहा इ टॉयलेट उभारण्यात आले असून सफाई कर्मचारी महिलांच्या हस्ते या टॉयलेटचे लोकार्पण करण्यात आले

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी मिळाला होता यामधून संगमनेर शहरात दहा इ टॉयलेट उभारण्यात आले आहे मालदाड रोड जय हिंद सर्कल येथे आज या टॉयलेटचा लोकार्पण सफाई कामगार महिला कमल छगन काकडे व माया रतन काकडे या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सौ दुर्गाताई तांबे सौ प्रमिलाताई अभंग यांसह विविध महिला भगिनी उपस्थित होत्या.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात विकसित व वैभवशाली शहर ठरले आहे सर्वात मोठी बाजारपेठ सुरक्षितता असल्याने नागरिकांची दररोज मोठी वर्दळ या शहरात असते आलेल्या नागरिकांना टॉयलेटची व्यवस्था व्हावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडून 30 जानेवारी 2024 रोजी 10 ई टॉयलेट करता एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता

या अंतर्गत नवीन नगर रोड, ताजने मळा, मालदाड रोड ,गणेश नगर, सह्याद्री महाविद्यालय, राजपाल कॉम्प्लेक्स या ठिकाणी हे ई टॉयलेट उभारण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते या टॉयलेटचा लोकार्पण करण्यात आला. या टॉयलेटमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान ऑपरेशन साठी सोलर लाइटिंग सिस्टीम पर्यावरण पूरक ऊर्जा वापरण्यासाठी वॉटर रिसायकलिंग युनिटचा वापर करण्यात आला आहे.

अत्यंत स्वच्छ व अत्याधुनिक असलेले हे टॉयलेट नागरिकांसाठी खुले झाले आहे. यामुळे संगमनेर शहरात येणाऱ्या सर्व नागरिक व महिलांची मोठी सोय होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपस्थित सर्व स्वच्छता कर्मचारी महिला भगिनी यांना राजपाल परिवाराच्यावतीने उन्हाळी स्कार्फ व साड्यांचे वाटपही सौ दुर्गाताई तांबे व हेमलता राजपाल यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात सर्व विकासाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.  स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर या संकल्पनेतून संगमनेर नगर परिषदेला स्वच्छतेचे राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला असून येणाऱ्या नागरिकांची टॉयलेटची व्यवस्था व्हावी याकरता ही टॉयलेट उभारण्यात आले असल्याचे माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांनी म्हटले आहे

सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान

 जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेर मधील सर्व सफाई कामगारांना सौ हेमलता राजपाल व राजपाल परिवाराच्यावतीने साडी व उन्हाळी स्कार्फचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला याचबरोबर एक कोटी रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या अद्यावत ही टॉयलेट चे लोकार्पण करण्याचा मानही या भगिनींना देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button