इतर

अकोल्यात मॉडर्न हायस्कूल मध्ये ४२ वर्षापूर्वीचे मित्रांची झाली अशी भेट!


अकोले प्रतिनिधी


तब्बल ४२ वर्षांनी १९७८ – ७९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी ला शिकत असतानाचे मित्र मैत्रीणी नुकतेच हिंदसेवा मंडळाच्या अकोले मॉडर्न हायस्कूल मध्ये भेटीनिमित्त जमले !

कुणी मुलं – सुना – नातवंडांची चौकशी करतोय तर कुणी शाळेतील जुन्या शिक्षक शिक्षिकांच्या आठवणी जागवतोय तर कुणी तेंव्हाच्या ९ वी – १० वी वर्गातील जागा शोधण्याच्या धडपडीत !

आजच्या घडीला इंजिनिअर , डॉक्टर , पोलीस अधिका।    ,झ्झझ्झZ,,...री , प्राध्यापक , उपप्राचार्य , उद्योजक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात  सेवानिवृत्त झालेले हे मित्र मॉडर्न हायस्कूल मध्ये जमले होते . नंदकुमार भांगरे , देविदास शंकर भालेराव , अतुल गंगाधर आरोटे , डॉ . किशोर गुजर , श्रीकृष्ण कोळपकर , डॉ . सुनील शिंदे , वैजयंती विष्णू जुगादे , मृणालिनी गाडगीळ , माधुरी गुजर , ज्योती शेटे , अरुण भिडे , राजेंद्र मंडपमाळवी ,  शरद वाबळे , प्रवीण मुंदडा यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी पुणे , मुंबई , पनवेल , नाशिक येथून अनौपचारिक भेटीत शाळेत जमले होते . 

अगस्ती आश्रम देवस्थान भेटीत व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी स्वागत करुन सर्वांचा धार्मिक भेट पुस्तक व श्रीफळ - पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन उपस्थितांच्या हस्ते महर्षी अगस्तींच्या आरतीचे नियोजन केले . 


 शालेय भेटीत व . पां . पैठणकर आणि त्यांच्या सौभाग्यवती तसेच विख्यात शिल्पकार ल . ना . भालेराव , गाडगीळ , व्ही . पी . जोशी यांच्यासह तत्कालीन माजी शिक्षकांच्या आठवणींना कृतज्ञतापूर्वक उजाळा देण्यात आला . स्थानिक स्कूल कमिटीचे पदाधिकारी मा . सतीश बूब आणि दिलीप शहा यांनी ७८ - ७९ सालच्या लौकिक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन संस्था उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या भूतपूर्व मान्यवरांच्या कार्याची माहिती दिली . प्राचार्य संतोष कचरे यांनी शालेय प्रगतीचा मागोवा घेत एकूणच विकास व गुणवत्तेचा निर्देश केला . डॉ . सुनील शिंदे यांनी संस्थेचे तत्कालीन सचिव दिवंगत स्वातंत्र्य सेनानी नानासाहेब निसळ तसेच मुख्याध्यापक पैठणकर आणि कला शिक्षक ल . ना . भालेराव , गाडगीळ या गुरुवर्यांच्या आठवणींचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन स्वलिखित पुस्तकांचा संच प्राचार्य संतोष कचरे यांच्याकडे शालेय ग्रंथालयास भेट दिला . सर्वश्री शरद वाबळे , डॉ . किशोर गुजर , बाळासाहेब कोळपकर , देविदास भालेराव आणि वैजयंती जुगादे यांनी मनोगतात शालेय संस्कारांचा संदर्भ दिला . विद्यमान कला शिक्षक मीनानाथ खराटे यांच्या कलागुणांच्या अभिमानास्पद कामगिरीचे याप्रसंगी सर्वांनीच कौतुक केले 
  श्री . गणेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button