मळगंगा यात्रेनिमित्त निघोज कुंड रस्त्याची दुरुस्ती करा – रुपेश ढवण,

दत्ता ठुबे
पारनेर :-निघोज गावासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई माता मळगंगा देवीचा यात्रोत्सव 21एप्रिल ते 23 एप्रिल 2025 या तारखेला होणार आहे.निघोज गाव ते मळगंगा कुंड या रस्त्यावरती अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खुप वाईट अवस्था झालेली आहे.याच ठिकाणी जगप्रसिद्ध असे रांजणखळगे आहेत. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येतात.सदर रस्त्यावरती अनेकदा अपघात झालेले आहेत आणि म्हणून लाखो भाविकांची दुरावस्था होऊ नये यासाठी सदरील देवस्थानाचे सर्व पदाधिकारी तसेच आमदार काशिनाथ दाते सर, खासदार निलेश लंके यांना वेळोवेळी प्रश्न मांडण्यात आलेले आहेत.

याबाबतचे निवेदनही अनेकदा बांधकाम विभाग, तहसीलदार, आमदार, खासदार यांना दिलेले असून अजूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.या रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर यात्रेच्या अगोदर हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा 15 एप्रिल 2025 रोजी अन्नत्याग उपोषण करणार असल्याचे निघोज येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण संस्थापक,अध्यक्ष यांनी सांगितले.