संगमनेर चे अरविंद गाडेकर यांचे व्यंगचित्र पुण्याच्या व्यंगचित्र प्रदर्शनात!

संगमनेर:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी ‘विवेकरेषा व्यंगचित्र स्पर्धा 2025’ आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी सहभाग नोंदविला होता. या सर्व व्यंगचित्रकार स्पर्धकांमधून विजेत्या स्पर्धेकांमध्ये संगमनेरचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या स्पर्धाकांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन पुणे येथे 5, 6,7 एप्रिल 2025 रोजी सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
संगमनेरचे पत्रकार आणि चित्रकार आनंद गायकवाड यांचा खुल्या गटात पाहिला नंबर आला आहे.

या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उदघाटन नागराज मंजुळे (सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते ), अरविंद जगताप (सुप्रसिद्ध लेखक आणि नाटककार), कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजुळ (सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार) यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर, दीपक गिरमे मिलिंद देशमुख, राहुल थोरात गणेश चिंचोले आणि महाराष्ट्रभरातून नामवंत व्यंगचित्रकार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे. अरविंद गाडेकर यांची निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अरविंद गाडेकर यांनी १२२०० व्यंगचित्र साकारली त्याबद्दल ग्लोबल बुक रेकॉर्ड या संस्थेचा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्राप्त केला आहे. तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्येही नोंद झालेली आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांची व्यंगचित्र दैनिक, दिवाळी अंक, साप्ताहिक आणि व्याख्याने, सादरीकरण या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहचले आहे.