अकोल्यात अमृतसागर दूध संघाच्या दूध उत्पादकांना प्रति लिटर एक रुपया दर वाढ – वैभवराव पिचड

अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू ठरत असलेल्या अमृतसागर सह दूध व्याव.व प्रक्रिया संघाच्या वतीने १एप्रिल पासून दुधाच्या दरात १ रुपयाची वाढ करण्यात आली असून आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३४ रुपये प्रति लिटर भाव मिळणार असल्याची माहिती चेअरमन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिली.
अमृतसागर दूध संघ नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेत असून दूध व्यवसायात सातत्याने चढउतार सुरू असतात. सहकारी दूध संघाने घेतलेल्या या दूध भाव वाढीच्या निर्णयामुळे आता खाजगी दूध प्रकल्पांना भाव वाढ देणे बंधनकारक होत आहे. माजी आमदार तथा चेअरमन वैभवराव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतसागर दूध संघाने कायम इतरांपेक्षा चांगला भाव दिला असून १ एप्रिल २०२५ पासून प्रति लिटर रुपये ३४ रुपये भाव देण्यात येणार असल्याचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, संचालक आनंदराव वाकचौरे, गोरक्ष मालुंजकर ,शरद चौधरी,अप्पासाहेब आवारी, रामदास आंबरे, अरूण गायकर ,जगन देशमुख, गंगाधर नाईकवाडी,सुभाष डोंगरे,बाबुराव बेनके,सौ अश्विनी धुमाळ,सौ सुलोचना औटी, दयानंद वैद्य,बाळासाहेब मुंढे आणि जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत यांनी सांगितले.
—————-