इतर

नेप्तीत चैत्र शुद्ध सप्तमी निमित्त श्रीकृष्ण मंदिरात यात्रा महोत्सव!

अहिल्यानगर :नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री चक्रधर स्वामी श्रीकृष्ण मंदिरात चैत्र शुद्ध सप्तमी निमित्त पंडित परिवार व ग्रामस्थांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.

सार्थक पंडित, मेघना पंडित, कृष्णा पंडित, चैतन्य लोणारे, अशोक लोणारे, यांनी मंदिरात आकर्षक फुलाची सजावट करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.

पहाटे ५ वाजता महानुभाव पंथाच्या तपस्विनी पुजारी राधाबाई पंडित यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णची आरती करण्यात आली. स. ९ वाजता सोमनाथ जपकर हस्ते अभिषेक घालण्यात आला. स. १० वाजता दिगंबर जाधव यांनी


गीता पारायण केले . स. ११ वाजता दत्तात्रय कवच पठण झाले. दुपारी.१२ वाजता ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक आरतीचा व पंचअवतार उपहारचा कार्यक्रम झाला.
सोमनाथ जपकर यांच्या हस्ते देवाला अभिषेक घालण्यात आला .सायंकाळी देवाचा घोडा व देवाची पालखी यांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाकडे फोडून मोठी आतषबाजी करण्यात आली .अमली वडगाव भजनी मंडळ व नेप्ती एकतारी भजनी मंडळ यांनी टाळ मृदंगाच्या गजरात मोठ्या भक्ती भावात मिरवणूक काढली.महिलांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या तसेच चौकात चौकात ग्रामस्थांनी देवाचे दर्शन घेतले.अन्नदाते भीमराज जपकर व गंगा आप्पा होळकर यांच्या हस्ते भाविकांमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री नेप्ती एकतारी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला .

यावेळी अनिल पंडित, सुनिल पंडित, सार्थक पंडित, आण्णा होळकर, रामदास फुले ,बाळासाहेब बेल्हेकर ,दत्ता जपकर, पोपट भुजबळ, अमोल चौगुले, पोपट मोरे , अनिल पवार बंटी कांडेकर, दिगंबर जाधव, चैतन्य लोणारे, अशोक लोणारे, बाबासाहेब गांगर्डे, निमगाव वाघा येथील संजय शिंदे, बाबासाहेब शिंदे ,सुदाम जाधव,
अशोक बोऱ्हाडे , बबन दादा होळकर, बंडू ढोले, प्रसाद ढोले, विवेक ढोले, यशराज पंडित, अक्षरा पंडित, सुरंगा विधाते व बबन शिंदे ,संतोष चहाळ, समस्त चौरे परिवार व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button