इतर

भावना अन् बुद्धि कृत्रिम बुद्धिमत्तेला सरेंडर करु नका .. ! ‘ : प्र – कुलगुरु डॉ . पराग काळकर


अकोले प्रतिनिधी

 मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा सुयोग्य मेळ तंत्रज्ञान क्षेत्रात आवश्यक असून भावना अथवा बुद्धिमत्ता ही नवीन विश्वातील कृत्रिम बुद्धिमत्तेला सरेंडर करुन चालणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे . केवळ जमा माहिती अर्थात डेटा सुपूर्त करणे व्यसनापेक्षा कठीण होते आहे. ' असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. पराग काळकर यांनी केले . ते अगस्ती महाविद्यालयात आयोजित वाणिज्य महोत्सव उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त, माजी आमदार वैभवराव पिचड होते . 

निसर्ग आणि यांत्रिकिकरण यातील उकल करताना डॉ. काळकर पुढे म्हणाले , ‘ समाज माध्यमांसह ए. आय् . आणि तत्सम अत्याधुनिक यंत्रणांचा वापर निर्मात्यांनी तसेच मोठ्या लोकांनी सामान्यांच्या मानेवर जोखडासारखा देऊन ते स्वतः मात्र आठवड्यातील अशा यंत्रणेचा वापर केवळ ४ ते ५ टक्के इतकाच करतात हे लक्षात घ्यायला हवे . सामान्यांच्या मानेवरील हे भूत ओळखावे . निसर्गाकडे दुर्लक्ष होते आहे. २०४० साली जग कसे असेल , व्यवसाय कसे असतील, परिस्थिती कशी असेल हे आज तरी कुणी सांगू शकत नाही . वापरात नसणारे घटक कालांतराने नष्ट होतात हा न्याय लक्षात घ्यावा लागेल. ‘

अध्यक्षीय भाषणात कार्य. विश्वस्त वैभव पिचड म्हणाले , ‘ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या प्रारंभी आदरणीय कै . मधुकरराव पिचड साहेबांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, त्यांची उपस्थिती संस्मरणीय ठरली. उपेक्षित वंचित तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात अगस्ती महाविद्यालयाने आणले . आजमितीला वाणिज्य शाखेतील अनेक विद्यार्थी चांगल्या कंपन्यांतून सेवेचा तसेच उच्च पदांवर सहभाग देत आहेत. ‘

प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी स्वागतपर मनोगतात विविध उपक्रम तसेच वाणिज्य शाखेतील यशस्वी कारकीर्दीचा आढावा घेतला. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ . सचिन पलांडे यांनी प्रास्ताविकात वाणिज्य शाखेतील पदवीधरांच्या व्यावसायिक तसेच विविध मार्केटिंग स्रोतातील नेत्रदीपक मागोवा घेतला.
याप्रसंगी अकोले एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव , स्वीकृत विश्वस्त एम् . डी. सोनवणे, अध्यक्ष इंजि. सुनील दातीर , सेक्रेटरी सुधाकर देशमुख, खजिनदार धनंजय संत , शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button