पार्वताबाई आरोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थाना भजनी साहित्याची भेट!

अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस, पत्रकार विश्वासराव आरोटे यांच्या आजी पार्वताबाई आरोटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ रामनवमीच्या पर्वकाळ मुहूर्तावर येथील कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या बालवारकऱ्यांना, तबला ,पखवाज, हार्मोनियम असे साहित्य भेट देण्यात आले,
यावेळी कोतुळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय लोखंडे, पत्रकार सुनिल गीते ,पत्रकार विनय समुद्र, कोतुळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह भ प नितीन महाराज गोडसे ,पत्रकार अशोकराव शेळके , सौ परिघाताई आरोटे, मुकुंद महाराज बोऱ्हाडे ,वारकरी ,व ग्रामस्थ आदी उपस्थित होते,

यावेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस श्री आरोटे यांनी बाल वारकऱ्यांना मार्गदर्शन केले,योग्य वेळी योग्य संस्कार झाले तर त्यातून आदर्शवादी विद्यार्थी घडतात ते देशाची व समाजाची सेवा करतात, कोतुळ हे माझ्या मामाचे गाव आहे,माझे लहानपण कोतुळ मध्येच गेले, त्यावेळी विनय समुद्र,अशोक शेळके, सुनील गीते आम्ही एकत्र असत, मी कितीही मोठा झालो तरी माझे बालपण जिथे गेले त्याची आठवण ठेवणे व त्यातून उतराई होण्यासाठी काहीतरी चांगले कर्म करणे हे मी माझे कर्तव्य समजतो असेही ते म्हणाले,कोतुळ येथील कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले,
या पुढेही बाल गोपालांसाठी मला जे काही करता येईल ते मी नक्कीच करीत राहीन असेही त्यांनी जाहीर केले,
कार्यक्रमाचे सूत्र संचलन ह भ प नितीन महाराज गोडसे यांनी केले, तर आभार सुनील गीते यांनी आभार मानले,