इतर

रोड मॉडेल व्हिलेजसाठी” बाभुळवाडे गावात राज्यातली पहिली ग्रामसभा-शरद पवळे


पारनेर :-पारनेर तालुक्यातील बाबुळवाडे गावात शेतरस्त्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर झाल्यामुळे शेतमाल बाजारात पोहोचवणे अवघड झाले त्याचबरोबर शेत जमिनी पडीक पडायला लागल्या, शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद विकोपाला जावु लागले त्याचबरोबर ग्रामपंचायत तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाल्यामुळे शेतरस्त्यांच्या संघार्षाला पूर्णविराम देण्यासाठी बाभुळवाडे ग्रामस्थांनी शरद पवळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित केली.

यावेळी रस्त्यांच्या समस्यांवर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली तदनंतर पवळे गावकऱ्यांनी दुरदृष्टी ठेवून गावाच हित समोर ठेवून वेळीच शेतरस्त्यांच्या बाबतीत जागरूकता निर्माण केल्यामुळे भविष्यात अनर्थ टळेल व गावात शेतकऱ्यांयमध्ये एकजुट राहील त्याचबरोबर पुढच्या पिढीच्या वाट्याला अशा समस्या राहणार नाही याची जबाबदारी आपण स्वीकारून गावाच्या उज्वल भविष्यासाठी आपण गावातील सर्व शेतरस्त्यांच्या नकाशाप्रमाणे हद्द निश्चित करू,गावातील प्रश्न गावात सोडवु, वहिवाटीच्या रस्त्यांना गाव नकाशावर घेवु , गावात जेष्ठ अनुभवी नागरीकांच्या माध्यमातून ग्रामशेतरस्ता समिती बनवू सर्व रस्ते सामंज्यास्यातून खुले करून दर्जेदार रस्त्यांसाठी पाठपुरावा करू व गावाला लोकसहभाग श्रमदानातून “रोड मॉडेल व्हिलेज बनवून राज्याला दिशादर्शक गाव बनवु यावेळी जेष्ठ मार्गदर्शक गुलाबराव नवले यांनी लोकसहभागातून स्वयंस्पुर्तीने शेतरस्ते खुले करणारांना लोकसहभागातून मोफत जेसीबी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.कार्यक्रमादरम्यान शिवाजी जगदाळे,प्रमोद खणकर, दिलीप बोरुडे आदींनी मनोगत व्यक्त करताना समस्या मांडल्या.यावेळी सोन्याबापु पोटे,डॉ. सुरेश खणकर,बाजीराव जगदाळे,जयराम जगदाळे, सविता जगदाळे,शोभा कोरडे,लक्ष्मी बोरुडे,दत्ता क्षीरसागर,भाऊ खोडदे, सावळेराम जगदाळे, गंगाराम पटाडे,मारुती जगदाळे,दादाभाऊ जगदाळे,भाऊ बोरुडे,अनिल जगदाळे,दशरथ जगदाळे,शांताराम बोरुडे,सावकार नवले यांसह अनेक शेतरस्ता पिडीत शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमात शरद पवळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच बाळासाहेब नवले यांनी केले.

२१,२२ एप्रिल रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शेतकऱ्यांचे शेतरस्त्यांच्या मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनाला बाभुळवाडे गावचा जाहीर पाठींबा त्याचबरोबर बाभुळवाडे गावाला “रोड मॉडेल व्हिलेज” करून राज्यात आदर्श उभा करण्यासाठी शिव पानंद शेतरस्ता चळवळीच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहू

बाळासाहेब नवले

(उपरपंच बाभुळवाडे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button