इतर

राजूरला नवाळी समाजाच्या मानाच्या काठीचा यात्रात्सोव साजरा.

विलास तुपे

राजूर/ प्रतिनिधी

महर्षी वाल्मिक ऋषी विश्वस्त मंडळ राजुर आयोजित पारंपारिक देवकाठीचे राजुर – रंधाफॉल -राजुर – कडे प्रस्थान व उत्साह पूर्ण वातावरणात भंडारा कार्यक्रमाचे आयोजन – प्रयोजन करण्यात आले सालाबादप्रमाणे पिढ्यान-पिढ्या चालत आलेली प्रथा नवाळी कुटुंबियांनी सुरू ठेवलेली आहे .

ही प्रथा नवाळी कुटुंबियांनी अनेक वर्ष सुरू ठेवली असून यातून एकजूट व समाजकारण , समाज बांधिलकी जोपासण्याचे कार्य सालाबाद प्रमाणे सुरू ठेवलेले आहे सोबत गेले सात वर्षापासून देवकाठी स्थानापन्न केल्या नंतर महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते . त्यात पंचक्रोशीतील सातशे ते आठशे भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात दुसऱ्या दिवशी मानाच्या देवकाठीचे प्रस्थान रंधाफॉल येथील घोरपडा देवीकडे होते राजुर – केळुंगण – माळेगाव – कातळापुर व रंधाफॉल असे पायी दिंडी यात्रेचे स्वरूप ज्यामध्ये लहान – मोठे सर्व भाविक भक्त मोठ्या उत्साहात व आनंदाने कळकळत्या उन्हात येणे – जाणे करतात ज्यात वयवर्ष पाच वर्षा पासून ते सत्तर वर्ष पर्यंत चे भाविक भक्त सर्व नवाळी परिवार व अन्य समाज बांधव यात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात समस्त नवाळी परिवार व सदस्यांची श्रद्धा या पारंपारिक उत्साहाला जोडलेली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button