संगमनेरला लाडोबा साहित्य लेखन कार्यशाळेचे उद्या उद्घाटन !

संगमनेर प्रतिनिधी
अमेद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमनेर व लाडोबा प्रकाशन पुणे यांच्या वतीने आयोजित लाडोबा साहित्य लेखन कार्यशाळेचे उद्घाटन उद्या दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ.सुधीर तांबे व महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ .शकुंतला काळे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी एकनाथराव आव्हाड बालकुमार साहित्य संमेलनांचे माजी अध्यक्ष गोविंदराव गोडबोले, लाडोबा प्रकाशनाचे प्रकाशक व ज्येष्ठ संपादक घनश्याम पाटील , ज्येष्ठ उद्योजक श्री डॉ. संजय मालपाणी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली.
दोन दिवस चालणाऱ्या साहित्य लेखन कार्यशाळेत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहेत. शिक्षकांनी काय आणि कसे लिहावे या विषयावरती नामवंत साहित्यिक डॉ. शकुंतला काळे, कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावर गोविंद गोडबोले मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्यक्ष कविता लेखन स्वरूपातील सत्र चला कविता लिहूया यात महाराष्ट्रातील नामवंत सिने गीतकार व कवयित्री श्रीमती ज्योती घनश्याम, अभिवाचन कला फुलवा या सत्रामध्ये महाराष्ट्रातील नामवंत अभिवाचक व्हाईस ओवर आर्टिस्ट माननीय रसिका तुळजापूरकर आणि लेखक दिग्दर्शक अक्षय उपळेकर मार्गदर्शन करणार आहेत. पुस्तक प्रकाशित करताना या लेखक प्रकाशक संवाद सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार व संपादक घनश्याम पाटील सहभागी होणार आहेत.लेखकांची गप्पा या सत्रामध्ये नागेश शेवाळकर ,प्रशांत केंदळे डॉ.संतोष खेडलेकर आदी सहभागी होणार आहेत. पाऊस कवितांच्या या निमंत्रितांच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील नामवंत कवी शशिकांत शिंदे हे भूषविणार आहे.
या कार्यशाळेचा समारोप महाराष्ट्रातील नामवंत ग्रामीण साहित्यिक प्रा.मा.रा.लामखडे , सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब वाघ यांच्या उपस्थितीत केला जाणार आहे. सदरची कार्यशाळा सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व लेखकांनी या कार्यशाळाचा लाभ घ्यावा असे आव्हान अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे सचिव संदीप वाकचौरे प्रकल्प समितीचे दत्तात्रय आरोटे ,स्मिता गुणे, मुकुंद डांगे, शांताराम डोंगरे, तुषार गायकर, अनिल देशपांडे ,प्रा.डॉ. संजय दळवी, विश्वनाथ भुजबळ ,श्री जोशी कार्यकारी समिती व संस्थेच्या वतीने करण्यात आले आहेत.