सामाजिक

पारनेर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी मोफत फळबाग लागवड – सुजित झावरे पाटील

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
सुजित झावरे पाटील यांच्या पुढाकाराने Say Trees Environmental Trust संस्थेच्या वतीने वासुंदे येथे शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण मोफत फळबाग लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.

या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना केशर आंबा, कालीपत्ती चिकू, मोसंबी, संत्रे, जांभूळ (कोकण बहाडोली), फणस, चिंच (प्रतिष्ठान) आणि नरेंद्र आवळा यासारख्या उच्च प्रतीच्या कलम रोपांचे मोफत वाटप केले जाणार आहे.

या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.Say Trees संस्था मियावाकी जंगल, अॅग्रोफॉरेस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक वृक्ष लागवड आणि बायोगॅस यासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय आहे.

अग्रोफॉरेस्ट्री प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत फळझाडे उपलब्ध करून देण्यासोबतच पुढील तीन वर्षे तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुजित झावरे पाटील यांनी सांगितले की, हा प्रकल्प पारनेर तालुक्यातील विविध भागांमध्ये राबवला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल आणि शाश्वत शेतीला चालना मिळेल.संस्था आणि मनरेगा यांच्या भागीदारीतून हा प्रकल्प खर्चमुक्त पद्धतीने राबवला जाणार आहे.

लवकरच तालुक्यात अग्रोफॉरेस्ट्रीच्या विविध पद्धती, लागवड तंत्रज्ञान, आर्थिक संधी आणि शाश्वत शेती यावर प्रशिक्षण आयोजित केले जाईल. या प्रशिक्षणात रोजगार सेवकांनी गावातील लाभार्थी शेतकऱ्यांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन झावरे पाटील यांनी केले. प्रशिक्षणानंतर शेतकऱ्यांना मोफत फळझाडांचे वाटप होईल.हा उपक्रम शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणारा ठरेल. स्थानिक नेतृत्व आणि ग्रामस्थांच्या सहभागाने हा प्रकल्प यशस्वी होण्याची खात्री आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button