
……
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत कोदणी ता. अकोले जि. अहमदनगर च्या कार्यक्षेत्रात असणारा Dodson-Lindblom Hydro Power Pvt Ltd चा भंडारदरा जल विद्युत प्रकल्प क्र 2 ग्रामपंचायतचा मालमत्ता कर देण्यास टाळा टाळ करत असल्याचा आरोप कोदणी ग्रामपंचायत ने केला आहे
महाराष्ट्र शासन च्या मान्यता व करार दस्तऐवज ग्रामपंचायत रेकॉर्डला नोंद करणेसाठी अनेक वेळा मागणी करून सदर कागदपत्र देण्यास कम्पनी चाल ढकल करत आहे
कोदणी येथील भंडारदरा जलविद्युत प्रकल्प विद्युत गृह क्र. २ याचे बांधकाम शासनाने केले असून महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग व मे. डॉडसन लिंडब्लोम हायड्रो पॉवर प्रालि. यांचे मध्ये दि. २५ जुलै २००६ रोजी भाडे करार (Lease Deed) होऊन ३० वर्षाकरीता भाडयाने हे विद्युतगृह चालविण्यात येत आहे. त्यापोटी वार्षिक भाडे महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग यांना देण्यात येते. मात्र ग्राम पंचायत कोदणी ला छदामही दिला जातं नाही पेसा ग्रामपंचायत च्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प 2006 पासून सुरु आहे कंपनी अथवा जलसंपदा विभागाकडून ग्रामपंचायत मालमत्ता कर ही दिला जात नाही याशिवाय गावात कोणत्याही भौतिक सुख सुविधां प्रकल्पाकडून पुरवल्या जात नाही तसेच स्थानिक तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळत नाहीअसा आरोप केला आहेत
शासनाच्या जलसंपदा विभागात व कंपनी कडून ग्रामपंचायतला ग्रामपंचायत स्थानिक मालमत्ता कर न दिल्यास ग्रामस्थांची बैठक घेऊन कंपनीला टाळे ठोकणे अथवा उपोषणाच्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आरपीआय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे